Uttar Pradesh Viral Video: उत्तर प्रदेशातील बागपतपाठोपाठ आता बुलंदशहरमध्ये थुंकणाऱ्या भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी भाजी विक्रेत्याला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील भाजी विक्रेत्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अनेकांनी मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अनुपशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला, ज्यात एक भाजी विक्रेता मंडईत भाजीपाल्यावर थुंकताना दिसला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुपशहर शहर पोलिस प्रभारी राकेश कुमार सिंह यांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी केली आणि आरोपी शमीम याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर विविध प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली.
ही व्यक्ती जाणीवपूर्वक भाज्यांवर थुंकत असल्याचा लोकांचा आरोप आहे. पण आरोपी शमीम गुटखा खातो असे सांगतो. तो सुपारीचा कण बाहेर काढत होता. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गिरीजा शंकर त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, एसएसपी श्लोक कुमार यांनी सांगितले की, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ३ डिसेंबर २०२४ रोजी बागपतमधील चौहल्डा गावातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात एका लग्न समारंभादरम्यान दोन तरुण थुंकताना आणि नान बनवताना दिसले. मात्र, हे करत असताना एका तरुणाने त्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
याआधी बाराबंकीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुधीमऊ येथील हाफिज जी हॉटेलमध्ये पिठात थुंकून चपाती बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी करत हॉटेल सील केले. मात्र, या घटनेने संबंधित हॉटेलमध्ये जेवायला येणाऱ्या लोकांच्या भिती निर्माण झाली.
संबंधित बातम्या