मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kanpur Accident : कानपूरमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने २७ जणांचा मृत्यू

Kanpur Accident : कानपूरमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली पलटल्याने २७ जणांचा मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 01, 2022 11:46 PM IST

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे.

कानपूरमध्ये भीषण अपघात
कानपूरमध्ये भीषण अपघात

कानपूरमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी भीषण अपघात झाला. साढ-घाटमपूर मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली खड्ड्यात पलटल्याने २७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन डझनहून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ मुले व ११ महिलांचा समावेश आहेत. घटनास्थळवर १२ रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करून जखमींवर योग्य व तात्काळ उपचाराचे निर्देश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कोरथा गावात राहणाऱ्या राजू निषाद नावाच्या व्यक्तीच्या एक वर्षाच्या मुलांचे मुंडन संस्कार होते. ज सकाळी ११ वाजता राजू ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन निषाद समाजाच्या ५० लोकांना घेऊन उन्नाव जिल्ह्यातील बक्सर येथील चंद्रिका देवी मंदिरात गेला होता. यामध्ये महिला व मुलांची संख्या अधिक होती,  मुंडन कार्यक्रमानंतर सर्वजण दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासाला लागले.

जखमी महिलेने सांगितले की, गावाकडे परतताना रस्त्यात देशी दारूचे दुकान होते. येथे ट्रॅक्टर थांबवून सर्व पुरुषांना दारू प्यायली होती. त्यानंतर राजूने ट्रॅक्टर गतीने चालवण्यास सुरूवात केली. त्यानंतर ति मद्यप्राशनाने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर अनियंत्रित झाला व रस्त्याकडेला असणाऱ्या मोठ्या खड्ड्यात कोसळला. पावसाचे पाणी साचल्याने याला तळ्याचे रुप आले होते.

त्यामुळे पाठीमागे असलेली ट्रॉली पलटी झाली आणि सर्वजण त्याखाली दबले गेले. या भीषण अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटकरून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातवाईकांना २-२ लाख तर जखमींना ५० हजाराचे सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.

WhatsApp channel