इंडिया गेट समोर केवळ टॉवेल परिधान करून नाचणाऱ्या तरुणीने दिले स्पष्टीकरण, म्हणाली, ‘मला बघायचं आहे की..’
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इंडिया गेट समोर केवळ टॉवेल परिधान करून नाचणाऱ्या तरुणीने दिले स्पष्टीकरण, म्हणाली, ‘मला बघायचं आहे की..’

इंडिया गेट समोर केवळ टॉवेल परिधान करून नाचणाऱ्या तरुणीने दिले स्पष्टीकरण, म्हणाली, ‘मला बघायचं आहे की..’

Nov 26, 2024 01:33 PM IST

Viral News : इंडिया गेटवर टॉवेल परिधान करून डान्स केल्यामुळे सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आलेली मॉडेल सन्नती मित्रा हिने आता स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. सन्नतीने दोन नवे व्हिडिओ शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे.

टॉवेल गुंडाळून तरुणीचा डान्स
टॉवेल गुंडाळून तरुणीचा डान्स

इंडिया गेट समोर केवळ  टॉवेल परिधान करत डान्स केल्यामुळे सोशल मीडिया युजर्सच्या निशाण्यावर आलेली मॉडेल सन्नती मित्रा हिने आता याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सन्नतीने दोन नवे व्हिडिओ शेअर करत आपलं म्हणणं मांडलं आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून तिने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे की, ती न्यूड नव्हती आणि तिने टॉवेलखाली कपडे घातले होते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती म्हणाली की, हा खरंतर तिचा प्रयोग होता आणि परदेशाप्रमाणे मुलींसाठी भारत सुरक्षित आहे का, हे तिला जाणून घ्यायचं होतं.

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक मुलगी अंगाभोवती पांढरा टॉवेल गुंडाळून इंडिया गेटवर डान्स करताना दिसत होती. यावर सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला. दुर्गा मंडपात छोटे कपडे परिधान केल्यामुळे यापूर्वीही ट्रोलिंगला बळी पडलेल्या सन्नतीवर दिल्ली पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही लोकांनी केली. यानंतर कोलकात्याच्या या मॉडेलने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. सन्नतीच्या म्हणण्यानुसार, ती २०१६ मध्ये मिस कोलकाता विजेती आहे

टॉवेल गुंडाळून डान्स केल्याच्या वादानंतर सन्नतीने यासंबंधीचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. एकामध्ये तिने कपड्यांवर टॉवेल कसा गुंडाळला हे दाखवले. आणखी एका व्हिडिओमध्ये ती म्हणते की, तिने केवळ एक प्रयोग केला आहे. तिने म्हटले की,  प्रत्येकाला प्रयोगशीलता आवडते आणि मलाही. मी टॉवेल घालून इंडिया गेटला जात आहे आणि बघू काय होते ते. 

सन्नतीने या पोस्टसोबत लिहिलं आहे की, 'भारत खरोखरच परदेशांप्रमाणे दिवसेंदिवस सुरक्षित होत आहे का? लोक काय म्हणतात?" गाडीत बसूनही ती टॉवेलमध्ये गुंडाळलेली दिसत आहे. ती हातात माईक घेऊन इंडिया गेटवर काही लोकांशी संवाद साधताना दिसत आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर