मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Top Events Today : रामनवमी उत्सव, तिमाही निकाल आणि नरेंद्र मोदी यांची सभा… आजचा दिवस बऱ्याच घडामोडींचा

Top Events Today : रामनवमी उत्सव, तिमाही निकाल आणि नरेंद्र मोदी यांची सभा… आजचा दिवस बऱ्याच घडामोडींचा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2024 08:30 AM IST

Top Events on April 17 : राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आज मोठ्या घडामोडी घडणार आहेत. पाहूया सविस्तर

Top Events Today : रामनवमी उत्सव, मोदींची सभा आणि तिमाही निकाल… आजचा दिवस बऱ्याच घडामोडींचा
Top Events Today : रामनवमी उत्सव, मोदींची सभा आणि तिमाही निकाल… आजचा दिवस बऱ्याच घडामोडींचा

Top News Today on 17 April 2024 : आजचा दिवस राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांच्या दृष्टीनं अनेक घडामोडींचा आहे. यात ईशान्य भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणारी प्रचारसभा, डॉली शर्माला पाठिंबा देण्यासाठी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद, आयपीएल २०२४, रामनवमी उत्सव आणि १० कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीचे निकाल या घटनांचा समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आजच्या संभाव्य घडामोडी पाहूया सविस्तर

> लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज आसाम आणि त्रिपुरामध्ये जाहीर सभा घेणार आहेत. येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

> काँग्रेस उमेदवार डॉली शर्मा यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आज गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

> चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे रामनवमीचा (Ram Navami) उत्सव आज देशभरात साजरा केला जाईल. आज रामनवमीनिमित्त सार्वजनिक आणि खासगी बँकांसह भारतीय शेअर बाजार बंद राहणार आहे. मात्र, ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे.

आर्थिक जगतात काय घडणार?

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कॉम्पे लिमिटेड, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, जस्ट डायल लिमिटेड, एंजेल वन लिमिटेड, ग्रेटेक्स कॉर्पोरेट, डीआरए कन्सल्टंट्स, केसीएल इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, हार्डकॅसल अँड वॉड Mfg Co Ltd, हॅथवे केबल अँड डेटाकॉम लिमिटेड आणि इन्फोमीडिया प्रेस लिमिटेड सह १० कंपन्या आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल (quarterly results) आज जाहीर करतील.

खेळाच्या मैदानावर काय?

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा (IPL) सामना रंगणार आहे. सध्या गुजरात टायटन्स ६ पैकी ३ सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सनं ६ पैकी २ क्रिकेट सामने जिंकले आहेत. हा संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे.

IPL_Entry_Point

विभाग