PM Internship scheme : तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. या अंतर्गत तरुणांना दरमहा ५००० हजार रुपये मिळणार आहे. तसेच त्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळणे सोपे होणार आहे. कारण, पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत टीसीएस, टेक महिंद्रा टू एल अँड टी, अपोलो टायर्स, टायटन, डिव्हिस लॅब्स आणि ब्रिटानिया सारख्या जवळपास ५० कंपन्यांनी पोर्टलच्या माध्यमातून तरुणांना १३ हजारांहून अधिक इंटर्नशिपच्या संधी दिल्या आहेत. या योजने अंतर्गत कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडे आतापर्यंत सुमारे २०० कंपन्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या कंपन्या तरुणांना रोजगार देण्यास इच्छुक आहेत.
पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत सरकारने या चालू आर्थिक वर्षात १.२ लाख लाखांहून तरुणांना इंटर्नशिपचे अंतर्गत रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा स्टील, आयटीसी, इंडियन ऑईल आणि आयसीआयसीआय बँक यांचा टॉप कंपन्या तरुणांना रोजगार देणार आहेत.
टीआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, टाटा ग्रुप आणि ज्युबिलंट फूडवर्क्स या कंपन्यानी आतापर्यंत सर्वाधिक इंटर्नशिपच्या संधी तरुणांना दिल्या आहेत. बँकिंग आणि वित्तीय सेवा, तेल, ऊर्जा, एफएमसीजी, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रांमध्ये देखील पीएम इंटर्नशिप योजने अंतर्गत तरुणांना रोजगाराच्या संधि मिळणार आहेत.
या योजनेत गेल्या तीन वर्षांतील सीएसआर खर्चाच्या बाबतीत पहिल्या ५०० कंपन्या तसेच त्यांचे विक्रेते व पुरवठादार यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याशिवाय यादीबाहेरील कंपन्याही स्वेच्छेने सहभागी होण्यास पात्र राहणार आहेत.
१७९ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या वर्क प्रोफाइलमध्ये सेल्स अँड मार्केटिंग, प्रॉडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑपरेशन्स मॅनेजमेंटपदांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ३ सप्टेंबरपासून ५०० कंपन्यांना समर्पित पोर्टलवर नोंदणी करण्याची आणि २१ ते २४ वयोगटातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत इंटर्नशिप देणार आहेत.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इंटर्नची पहिली बॅच एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कामावर ठेवली जाणार आहे. त्यांना दरमहा ५,००० रुपये दिले जाणार आहे आणि ६,००० रुपये एकरकमी त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे.
संबंधित बातम्या