Israel hezbollah war : इस्रायली लष्करानं शुक्रवारी लेबनॉनवर भीषण हवाली हल्ले केले. यात हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचे अनेक टॉप कमांडर मारले गेले. या हल्ल्यात संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहही मारला गेला आहे. इस्रायलच्या या कारवाईचा उद्देश हिजबुल्लाची लष्करी ताकद कमकुवत करणे हा होता. इस्रायलने सर्व टॉप कमांडरची हत्या करून उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. या बाबतचे ट्विट इस्रायली संरक्षण दल (IDF) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर पोस्ट केलं आहे. ज्यात सर्व नेत्यांची यादी देण्यात आली आहे.
आयडीएफने ट्विट केलेल्या फोटोट ठार मारण्यात आलेल्या हिजबुल्लाचे सर्व कमांडर दिसत आहेत. इस्रायली सैन्याने या सर्वांना ठार मारल्याचा दावा केला आहे. या फोटोत हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला शीर्षस्थानी दिसत आहे. त्या खाली हिजबुल्लाच्या इतर महत्वाच्या नेत्यांचे फोटो आहेत. नसराल्लाह हे तीन दशकांहून अधिक काळ हिजबुल्लाहचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हिजबुल्ला एक शक्तिशाली लष्करी आणि राजकीय शक्ती म्हणून उदयास आली.
आयडीएफच्या म्हणण्यानुसार, निवासी इमारतीच्या खाली लपून बसलेल्या हिजबुल्लाच्या केंद्रीय कमांड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात नसराल्लाह मारला गेला. नसराल्लाहच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहचे कंबरडे मोडले आहे. आयडीएफने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये हसन नसराल्लाह व्यतिरिक्त ज्या कमांडर्सचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यात अली कार्की, मोहम्मद अली इस्माईल, इब्राहिम मोहम्मद कुबैसी यांचाही समावेश आहे.
हिजबुल्लाहचा दक्षिण आघाडीचा कमांडर अली कार्कीहीला इस्रायलने ठार मारलं आहे. आयडीएफने सांगितले की कार्की हा हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा प्रमुख होता आणि इतर प्रमुख नेत्यांसह इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तो मारला गेला.
इस्रायली लष्कराच्या निवेदनानुसार, हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा कमांडर मोहम्मद अली इस्माइल देखील या हल्ल्यात मारला गेला आहे. इस्माईलवर इस्रायलविरुद्ध अनेक दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप होता, ज्यामध्ये इस्रायलवर रॉकेट डागण्याच्या घटनांचा समावेश आहे.
इब्राहिम कुबैसी हा हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र आणि रॉकेट दलाचा प्रमुख होता. अन्य वरिष्ठ नेत्यांसह कुबैसी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, कुबैसी इस्रायलवर अनेक हल्ल्यांच्या योजना आखण्यात सहभागी होता.
इब्राहिम अकील: हिजबुल्लाहचा ऑपरेशन कमांडर जो २० सप्टेंबर रोजी मरण पावला.
अहमद वहाबी: रडवान स्पेशल फोर्सचे मिलिटरी ऑपरेशन्स चीफ जो २० सप्टेंबर रोजी मारला गेला.
फुआद शुकर: ३० जुलै रोजी इस्रायली हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाहच्या सर्वोच्च कमांडरपैकी एक होता.
मोहम्मद नासेर: दक्षिण-पश्चिम लेबनॉनमध्ये इस्रायलवर गोळीबार करण्याचा प्रभारी होता, ३ जुलै रोजी मारला गेला.
तालिब अब्दुल्ला: हिजबुल्लाच्या मध्यवर्ती प्रदेशाचा कमांडर, जो १२ जून रोजी इस्रायली हल्ल्यात मारला गेला.