मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान; कोण विजयी होणार?

Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान; कोण विजयी होणार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 18, 2022 08:38 AM IST

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. भाजपकडून द्रौपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आल्यानं या निवडणुकीची चुरस वाढली आहे.

Presidential Election 2022
Presidential Election 2022 (HT)

Indian Presidential Election 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून द्रोपदी मुर्मू तर विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आल्यानं निवडणुकीतील चुरस वाढली आहे. आज मतदान पार पडल्यानंतर २१ जुलैला मतगणना होईल. यात विजयी झालेला उमेदवार २५ जुलै रोजी देशाचा राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. त्यामुळं आजची निवडणुक ही भारताच्या राजकारणाच्या दृष्टीनं फार महत्त्वूर्ण असणार आहे.

संसदेच्या खोली क्रमांक ६३ मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सहा बुथ उभारण्यात आले असून त्यात एक बुथ दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि विरोधकांनी या निवडणुकीत विजयी होण्यासाठी फिल्डिंग लावली होती. त्यामुळं आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होणार?

  • इलेक्टोरल कोलेजच्या माध्यमातून उमेदवाराला मतदान केलं जाणार.
  • लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार या निवडणुकीत मतदान करतील.
  • देशातील सर्व राज्यांसहित दिल्ली आणि पॉंडिचेरीतील विधानसभेत निवडून आलेले आमदारांनाही मतदान करण्याचा हक्क.
  • नामनिर्देशित खासदार किंवा आमदारांना मतदान करण्याचा अधिकार नाही.

कशी आहे मतदान प्रक्रिया?

राष्ट्रपतीपदाची निवडणुक गुप्त पद्धतीनं होते, यात मतदारांना उमेदवाराच्या नावाला पसंतीक्रम द्यावा लागतो. याशिवाय मतदानात गुप्तता पाळणंदेखील फार महत्त्वाचं असतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही मतदाराला मतपत्रिका दाखवण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

भाजपकडून द्रौपदी मुर्मू या रिंगणात...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. सध्याचं राजकीय बलाबल पाहता देशाला पहिल्या आदिवासी म्हणून द्रौपदी मुर्मू यांना संधी मिळू शकते. याशिवाय मुर्मू यांनी याआधी २०१५ ते २०२१ या काळात झारखंडचं राज्यपालपदही संभाळलेलं आहे.

यशवंत सिन्हा विरोधकांचे उमेदवार...

तृणमुल कॉंग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी २४ वर्ष प्रशासनात काम केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद संभाळलं होतं. त्यानंतर त्यांची भाजपमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये गणना केली जायची. परंतु मोदींशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तृणमुल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता ते विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या