हवामान विभागाने देशभरात यावर्षी तीव्र उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. यानंतर केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घेतली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी बैठक बोलावली. या बैठकीत आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारांना अॅडव्हायझरी जारी करण्यास सांगितले आहे.
या बैठकीनंतर आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी म्हटले की, आईएमडीने यावर्षी अल-निनोची भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे यावर्षी उणतेची लाट येण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले की, यंदाच्या उन्हाळ्यात सरासरी तापमान सामान्य पातळीहून अधिक असणार आहे. मंडावीया यांनी म्हटले की, यंदाचं वर्ष निवडणुकाचं वर्ष आहे. उष्णतेच्या लाटेमुळे हीट स्ट्रोक (heat strokeहोऊ नये, यापासून बचाव करण्यासाठी आयएमडी, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत एक आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाने मंगळवारी दक्षिण बंगालमधील जिल्ह्यांत ६ एप्रिल पर्यंत लू चा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दक्षिण बंगालमधील काही जिल्ह्यात येत्या काही दिवसात कमाल तापमानात २ ते ३ डिग्री सेल्सिअस वृद्धी होण्याचा इशारा दिला आहे. देशभरात एप्रिल ते जून पर्यंत उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. याचा मध्य व पश्चिम किनारपट्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं की, उष्णतेची लाट हीट स्ट्रोकचे रुप घेऊ नये यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. हीट स्ट्रोक उष्णतेमुळे होणारा गंभीर आजार आहे. हे तेव्हाच होते जेव्हा शरीर आपल्या तापमानाला नियंत्रित करू शकत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात जितकं तापमान असतं त्याहून अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. त्यांनी म्हटले की, निवडणूक प्रचारासाठी जाताना सोबत पाणी घेऊन जा तसेच वेळोवेळी पाणी पित जा. त्याचबरोबर फळांचा रसही पिणे आवश्यक आहे. याशिवाय लिंबू पाणी प्यायले पाहिजे. उन्हाळ्यात मिळणारी फळे, जसे कलिंगड, टरबूज खाल्ले पाहिजेत.
हवामान विभागाने गुजरात, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. एप्रिल ते जून महिन्यात देशाच्या अनेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील काही भागात तसेच उत्तर-पश्चिम भारतात तापमान सरासरी राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या