मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rajya Sabha Election 2024: टीएमसीकडून राज्यसभेसाठी पत्रकार सागरिका घोषसह ४ उमेदवारांची घोषणा

Rajya Sabha Election 2024: टीएमसीकडून राज्यसभेसाठी पत्रकार सागरिका घोषसह ४ उमेदवारांची घोषणा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 11, 2024 10:04 PM IST

TMC Rajya Sabha candidates List: तृणमूल काँग्रेसने राज्यसभेसाठी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली.

Rajya Sabha Election
Rajya Sabha Election

Rajya Sabha Election 2024: तृणमूल काँग्रेसने राज्यसभेसाठी आपल्या ४ उम्मीदवारांच्या नावाची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पुन्हा एकदा सुष्मिता देव यांना राज्यसभा पाठवत आहे. याशिवाय, पत्रकार सागरिका घोष, ममता बाला ठाकूर आणि नामिदुल हक यांचा यादीत समावेश आहे. टीएमसीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आणि निवडक उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा दिली.

येत्या २७ फेब्रुवारी २०२४ रोजी १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह ५६ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपत आहे. याशिवाय, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचाही या यादीत समावेश आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ८ फेब्रुवारीपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली. १५ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल आणि २० फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान, २७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेतील ५० सदस्य येत्या २ एप्रिलला निवृत्त होतील. तर, ६ सदस्य ३ एप्रिलला निवृत्त होतील. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक १० जागा रिक्त होत आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि बिहार येथून प्रत्येकी ६-६, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथून प्रत्येकी ५-५, कर्नाटक आणि गुजरात येथून ४-४, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून ३-३, राजस्थान आणि उत्तराखंड येथून प्रत्येकी २-२, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड येथून प्रत्येकी एक जागा रिक्त होत आहे.

WhatsApp channel