ममता बनर्जींना मोठा झटका, TMC खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्तीचा राजीनामा; कारण काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ममता बनर्जींना मोठा झटका, TMC खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्तीचा राजीनामा; कारण काय?

ममता बनर्जींना मोठा झटका, TMC खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्तीचा राजीनामा; कारण काय?

Published Feb 15, 2024 06:45 PM IST

MP Mimi Chakraborty Resigned : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती यांनी गुरुवार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे.

mimi Chakraborty 
mimi Chakraborty 

लोकसभा निवडणुकीच्या आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती यांनी गुरुवार आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे आपला पदाचा राजीनामा दिला आहे. मिमी स्थानिक टीएमसी नेतृत्वावर खूश नसल्याने तिने आपल्या पदाची राजीनामा दिला आहे.

मिमी चक्रवर्ती हे बंगाली चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. २०१२ मध्ये त्यांनी चॅम्पिअन सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. आतापर्यंत त्यांनी २५ हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांची लोकप्रियता पाहून टीएमसीने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते.

२०१९ च्या लोकसबा निवडणुकीत मिमी चक्रवर्ती जादवपूर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपचे अनुपम हाजरा यांना पराभूत केले होते. 

या महिन्याच्या सुरूवातीला बंगाली फिल्म स्टार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी यांनीही पक्षाला धक्का दिला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील तीन समितींचा राजीनामा दिला होता. 

दीपक अधिकारी टॉलीवूडमधील मोठा चेहरा आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण सांगितले नव्हते, मात्र म्हटले जात आहे की, त्यांना राजकारणातून निवृत्त होऊन अभिनयावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्याचबरोबर असेही असमोर आले की, मतदारसंघातील टीएमसी कार्यकर्त्यासोबत अनेक मुद्यावर मतभद होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर