मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ramendu Sinha Roy : अयोध्येतील राम मंदिर अपवित्र, हिंदूंनी पूजा करू नये; आमदाराच्या विधानानं वाद

Ramendu Sinha Roy : अयोध्येतील राम मंदिर अपवित्र, हिंदूंनी पूजा करू नये; आमदाराच्या विधानानं वाद

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 05, 2024 01:49 PM IST

Ramendu Sinha Roy : तृणमूल काँग्रेसचे (TMC) आमदार रामेंदू सिन्हा रॉय यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत (Ayodhya Ram Mandir) केलेल्या विधानामुळं वाद निर्माण झाला आहे.

राम मंदिर अपवित्र, हिंदूंनी पूजा करू नये; आमदाराचं विधान
राम मंदिर अपवित्र, हिंदूंनी पूजा करू नये; आमदाराचं विधान

Ramendu Sinha Roy : ‘अयोध्येतील राम मंदिर हे केवळ ‘शो पीस’ आहे. हे मंदिर (Ram Mandir) अपवित्र आहे. कुठल्याही हिंदूनं तिथं पूजा करू नये.’

हे उद्गार आहेत पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा रॉय (Ramendu Sinha Roy) यांचे. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानं मोठा वाद निर्माण झाला आहे.

रामेंदू रॉय हे पश्चिम बंगालमधील तारकेश्वर मतदारसंघाचे टीएमसीचे आमदार आहेत. ते तृणमूल काँग्रेसचे आरामबाग जिल्ह्याचे अध्यक्ष देखील आहेत. भाजपवर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

रॉय यांच्या विधानास भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तर, भाजपचे आमदार बिमान घोष यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचं समजतं. शुभेंदू अधिकारी यांनी रामेंदू रॉय यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शुभेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून रामेंदू यांच्या विधानाचा निषेध केला आहे. 'ही टीएमसी नेत्यांची भाषा आहे. तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व प्रभू रामचंद्रांचा किती आदर करतं हेच त्यांनी दाखवून दिलं आहे. मी केवळ त्यांच्या वक्तव्याचा निषेधच करणार नाही, तर जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या या वक्तव्याबद्दल तक्रारही दाखल केली आहे,' असं अधिकारी यांनी म्हटलं आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा

प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल हिंदू पक्षकारांच्या बाजूनं लागला. त्यानंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिराची उभारणी सुरू झाली आहे. अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावेळी उपस्थित होती.

WhatsApp channel