जलसमाधी मिळण्यापूर्वी लोकांनी काय खाल्ले होते, ११२ वर्षापूर्वीचे Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जलसमाधी मिळण्यापूर्वी लोकांनी काय खाल्ले होते, ११२ वर्षापूर्वीचे Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल

जलसमाधी मिळण्यापूर्वी लोकांनी काय खाल्ले होते, ११२ वर्षापूर्वीचे Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल

Apr 10, 2024 04:49 PM IST

Titanic Food Menu Card : ११२ वर्षापूर्वी समुद्रात पोटात गडप झालेल्या टायटॅनिक जहाजातील मेन्यू कार्ड सध्या व्हायरल झाले आहे. जहाज बुडण्यापुर्वी प्रवाशांनी काय खाल्ले होते, हे समोर आले आहे.

Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल
Titanic जहाजातील मेन्यू कार्ड व्हायरल

Titanic Menu Card : जगातील सर्वात प्रसिद्ध जहाज टायटॅनिक ११२ वर्षापूर्वी आपल्या पहिल्याच प्रवासात बुडाले होते. त्यानंतरही या महाकाय जहाजातील छोट्यातील छोट्या गोष्टींही चर्चांचा विषय बनल्या होत्या. १५ एप्रिल १९१२ रोजी टायटॅनिक अटलांटिक महासागरात बुडाले होते. या अपघातात जवळपास १५०० लोकांना जलसमाधी मिळाली होती. हे जहाज बुडण्याच्या एक रात्र आधी प्रवाशांना देण्यात आलेल्या भोजनाशी संबंधित मेन्यू कार्ड आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

११२ वर्षापूर्वी बुडाले होते टायटॅनिक जहाज - 
टायटॅनिकच्या मेन्यू कार्डबाबत एक ट्विटर यूजर Fascinating ने पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये ११२ वर्षापूर्वीचे टायटॅनिक फूड मेन्यू कार्ड शेअर करण्यात आले होते. या मेनू कार्डवर टायटॅनिक मधून प्रवास करणाऱ्या प्रथम आणि तृतीय श्रेणीच्या प्रवाशांसाठी तयार केलेले खाद्य पदार्श दिसून येतात. टायटॅनिकमधील फूड मेन्यू कार्डचा काही वर्षापूर्वी ब्रिटनमध्ये लिलाव करण्यात आला होता. जे मेन्यू कार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये चिकन, कॉर्न बीफ,  भाज्या आणि फ्राइस यांचा उल्लेख आहे. यामध्ये ग्रिल्ड मटन, हॅम पाई, सॉसेज चीज, फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. हे सर्व केवळ प्रथम श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. 

११२ वर्षापूर्वी टायटॅनिक समुद्राच्या खोलीत गडप झाले होते. मात्र २१ व्या शतकातही या जहाजामध्ये स्वारस्य दाखवणारे कमी नाहीत. याची प्रतिची सध्या व्हायरल पोस्टवरून येत आहे. पोस्टमध्ये व्हायरल दोन्ही क्लासच्या मेन्यू वर १४ एप्रिल १९१२ ही तारीख टाकण्यात आली आहे. मेन्यू शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, 'टायटॅनिक बुडण्याच्या एक दिवस आधी, १४ एप्रिल १९१२ टायटॅनिक फर्स्ट क्लास vs थर्ड क्लास मेन्यू.'

यूजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया -
टायटॅनिक जहाजातील तृतीय श्रेणीच्या प्रवाशांच्या भोजनात डाळी, दूध, बटाटे, हॅम,  अंडे, ब्रेड,  तूप, जॅम, चहा व कॉफी यादी पदार्थांचा समावेश आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही पोस्ट आतापर्यंत १०.२ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. त्याचबरोबर ८ हजाराहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्स आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने लिहिले, तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांसाठी कोणताही स्पेशल आयटमचा समावेश नाही. दूसऱ्या यूजरने लिहिले तिसऱ्या श्रेणीतील प्रवाशांना दिवसा केवळ डाळ दिली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर