Doctor attack : कोलकातानंतर आता आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला, केसांना धरून ओढले अन्… पाहा VIDEO-tirupati patient attacks female intern at svims hospital doctors demand security ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Doctor attack : कोलकातानंतर आता आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला, केसांना धरून ओढले अन्… पाहा VIDEO

Doctor attack : कोलकातानंतर आता आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ला, केसांना धरून ओढले अन्… पाहा VIDEO

Aug 27, 2024 05:08 PM IST

Attack On Doctor : तिरुपती येथे रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

रुग्णाचा महिला डॉक्टरवर हल्ला
रुग्णाचा महिला डॉक्टरवर हल्ला

कोलकातामध्ये ट्रेनी डॉक्टरवर रुग्णालयातच झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ माजली आहे. यानंतर डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. संपावर गेलेले डॉक्टर सरकारकडे न्यायासोबतच रुग्णालयात विमानतळांच्या धर्तीवर सुरक्षा पुरवण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवरआंध्र प्रदेशातील श्री वेंकटेश्वर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेज (SVIMS) च्या कॅज्युअल्टी वार्डात एका रुग्णाकडून महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

महिला इंटर्नवर हल्ला केल्यानंतर पद्मावती मेडिकल कॉलेज फॉर विमेनच्या जूनियर डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी घटनेच्या विरोधात निर्देशने केली. हल्ला केलेल्या रुग्णाचे नाव बंगाराजू असे आहे. आरोपी बंगाराजू आपल्या कुटूंबासोबत तीर्थयात्रा करण्यास तिरुमालाला आला होता. एका रुग्णाला घेऊन तो शनिवारी एसव्हीआयएमएस रुग्णालयात आला होता. त्यावेळी रुग्णावर उपचार करणाऱ्या महिला इंटर्नवर त्याने हल्ला केला.

महिला इंटर्नवर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये बंगाराजू महिला डॉक्टरवर हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, रुग्ण महिला डॉक्टरच्या पाठीमागून येतो व तिचे केस पकडून तिचं डोकं हॉस्पिटलमधील बेडच्या स्टील फ्रेमवर आपटतो. हा प्रकार पाहून वॉर्डमधील अन्य डॉक्टर महिला सहकाऱ्याच्या मदतीसाठी धाव घेतात. सर्वजण रुग्णाला पकडून बाजुला नेतात व महिलेची सुटका करतात.

हल्ला झालेल्या महिला डॉक्टरने याबाबत रुग्णालयाचे संचालक आणि डीन डॉ. आरव्ही कुमार यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, ती शनिवारी आपत्कालीन औषध विभागात कर्तव्यावर होती. त्यावेळी तिच्यावर एका रुग्णाने अनपेक्षितपणे हल्ला केला. बंगारू राजू असे त्याचे नाव असून तो पाठीमागून धावत माझ्याजवळ आला,त्याने माझे केस ओढले आणि एका खाटेच्या स्टीलच्या रॉडवर डोके आपटायला सुरुवात केली, असे तिने पत्रात नमूद केलं आहे.

जर रुग्णाकडे धारदार शस्त्र असतं तर परिस्थिती गंभीर होऊ शकली असती,असंही तिने म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा उपाय करावेत, अशी मागणी तिने केली आहे. दरम्यान या घटनेनंतर सुरक्षेची मागणी करत रुग्णालयातील डॉक्टर व विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन केलं.