tirupati laddu : सुप्रीम कोर्टात पोहोचला तिरुपतीच्या लाडूचा वाद! सोमवारी होणार सुनावणी-tirupati laddu animal fat controversy supreme court to hear petitions seeking probe ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  tirupati laddu : सुप्रीम कोर्टात पोहोचला तिरुपतीच्या लाडूचा वाद! सोमवारी होणार सुनावणी

tirupati laddu : सुप्रीम कोर्टात पोहोचला तिरुपतीच्या लाडूचा वाद! सोमवारी होणार सुनावणी

Sep 28, 2024 10:30 AM IST

tirupati laddu controversy in SC : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केला होता की राज्यातील मागील वायएसआरसीपी सरकारने श्री व्यंकटेश्वर मंदिराला देखील सोडले नाही आणि लाडू बनवण्यासाठी निकृष्ट साहित्य आणि प्राण्यांची चरबी वापरली गेली.

सुप्रीम कोर्टात पोहोचला तिरुपतीच्या लाडूचावाद! सोमवारी होणार सुनावणी
सुप्रीम कोर्टात पोहोचला तिरुपतीच्या लाडूचावाद! सोमवारी होणार सुनावणी

tirupati laddu controversy in SC : तिरुपतीच्या प्रसिद्ध लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापराचा वाद सर्वोच्च न्यायालयात (SC) पोहोचला आहे. सोमवारी या प्रकरणावर देशातील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी या याhttps://www.hindustantimes.com/ht-img/img/2024/09/24/original/On-Sunday--Naidu-ordered-a-probe-by-the-SIT-into-t_1727205894043.jpg?1727492529747चिका दाखल केल्या आहेत. सुब्बा रेड्डी हे वायएसआर काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी काही दिवसांपुवरी आरोप केला होता की राज्यातील मागील युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) सरकारने श्री वेंकटेश्वर मंदिरातील प्रसदाचा लाडू लाडू बनवण्यासाठी निकृष्ट साहित्य व प्राण्यांच्या चरबीचा वापर केला. या आरोपांमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला आणि करोडो हिंदूं धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.

आता सुब्रमण्यम स्वामी आणि वायवी सुब्बा रेड्डी या दोघांनीही या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. भाजप नेत्याने या आठवड्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या जनहित याचिकेत (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश सरकारला लाडू बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपाचा तपशीलवार फॉरेन्सिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरातमधील प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देत राज्य सरकारने असा दावा केला होता की लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर, फिश ऑइलचे अंश सापडले आहेत. "मंदिरातील अर्पण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी देखरेख ठेवणे गरजेचे होते असे देखील याचिकेत म्हटले आहे.

सरकारने स्थापन केली चौकशी समिती

दरम्यान, तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिरात अर्पण केलेल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने नऊ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले आहे. "तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार आणि सर्वसमावेशक तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे," असे मुख्य सचिव नीरभ कुमार प्रसाद यांनी सांगितले.

TTD हे तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर ट्रस्टी आहेत. लाडूंमध्ये भेसळ केल्याच्या आरोपांची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी २२ सप्टेंबर रोजी केली होती. एसआयटीचे नेतृत्व गुंटूर रेंजचे पोलिस महानिरीक्षक (IGP) सर्वेश त्रिपाठी आणि इतर पोलिस अधिकारी करत आहेत.

Whats_app_banner
विभाग