Tirumala Tirupati devasthanam : आंध्र प्रदेश सरकारने नव्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाची घोषणा केली आहे. याचे अध्यक्ष बीआर नायडू यांना बनवण्यात आले आहे. नवनियुक्त अध्यक्ष नायडू यांना पदभार सांभाळताच घोषणा केली की, त्यांचे प्राधान्य दुसऱ्या धर्मातील लोकांना व्हिआरएस देणे आहे. तिरुमला मंदिरात केवळ हिंदू कर्मचारीत असावेत
बीआर नायडू यांनी म्हटले की, टीटीडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. माझ्या जन्म व चित्तूर जिल्ह्यातील आहे. आम्ही नियमित तिरुमला जात होतो. माझी नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (chandrababu naidu) आणि एनडीए नेत्यांचे आभार मानतो.
भगवान व्यंकटेश्वराचे निवासस्थान असलेल्या तिरुमला मंदिरात काम करणारे सर्व कर्मचारी हिंदू समाजातील असावेत, असे टीटीडी बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी म्हटले आहे. तिरुमला येथे काम करणाऱ्या इतर धर्माच्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यावा, याविषयी सीएम चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र सरकारशी चर्चा करणार असल्याचेही नायडू यांनी सांगितले आहे.
त्यांनी म्हटले की, मागील सरकारने तिरुपतीत अनेक चुका केल्या. मी पाच वर्षात एकदाही तिरुमला गेलो नाही. कारण मला वाटले की, मंदिराची पवित्रता राहिली नाही. त्याआधी मी वर्षातून पाच ते सहा वेळा तिरुमला जात होतो. मी या मुद्द्यावर सीएम चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली. माझा उद्देश्य केवळ काम करणे आहे. मी सरकारशी तिरुमलामध्ये काम करत असलेल्या अन्य धर्माच्या लोकांबाबत बोलणार आहे. त्यांनी दुसऱ्या विभागात पाठवावे किंवा त्यांना व्हीआरएस दिला जावा.
नवनियुक्त अध्यक्षाने म्हटले की, नवी समिती मागील समितीच्या तुलनेत चांगले काम करत आहे. आता कोणतीच समस्या नाही. मागील महिन्यात टीटीडीने 'ब्रह्मोत्सवम' चे आयोजन केले होते. यामध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न करणार आहे.
आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी तिरुमलाच्या नव्या बोर्डाची घोषणा केली. या कार्यकारिणीत कर्नाटकचे तीन, तेलंगाणाचे पाच तामिळनाडूतील २ तर गुजरात आणि महाराष्ट्रातून एक-एक सदस्य नियुक्त करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या