मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आता टॉयलेटच्या बाहेरही टायमर! किती वेळ बसलात? कधी बाहेर आलात? सर्व नोंद होणार, पाहा Video

आता टॉयलेटच्या बाहेरही टायमर! किती वेळ बसलात? कधी बाहेर आलात? सर्व नोंद होणार, पाहा Video

Jun 14, 2024 05:47 PM IST

Timersetupintoilet : चीनमधील जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या युगांग ग्रोटाजमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर टायमर लावले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

आता टॉयलेटबाहेरही टायमर
आता टॉयलेटबाहेरही टायमर

Timer in toilet : चीनमधील यूनेस्को द्वारे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या युगांग ग्रोटोजचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येथे निर्माण केलेल्या सार्वजनिक शौचालयात स्थानिक प्रशासनाने कथितरित्या टायमर लावले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्टनुसार यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेले युगांग ग्रोटोज लोकांना आकर्षित करत आहे. कारण प्राधिकरणाने महिलांच्या शौचालयात टायमर लावले आहे. टॉयलेटमध्ये टायमर लावल्याचा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा शांक्सी प्रांतातील दातोंग शहरात बौद्ध पर्यटन स्थळावर आलेल्या एका पर्यटकाने याचे चित्रिकरण केले व याचा व्हिडिओ एका सरकारी स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयात पाठवला. या व्हिडिओत दिसते की, प्रत्येक टॉयलेटच्या बाहेर एक डिजिटल टायमर लावले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, शौचालयात कोणी नसताना एलईडीवर हिरवा रंग दिसतो. हा रंग शौचालय कोणीही वापरत नसल्याचा संकेत आहे. त्याचबरोबर जेव्हाशौचालयाचा वापर होत असतो तेव्हा स्क्रीनवर मिनिट व सेकंदाला टायमर सुरू असतो. स्क्रीनवर स्पष्ट पाहू शकता की, शौचालयाचा किती वेळापासून वापर केला जात आहे.

यूनोस्को वारसा स्थळाच्या यादीत युंगांग ग्रोटोजचा समावेश -

चीनच्या शांक्सी प्रांतातील डाटोंग शहरात असलेल्या युंगांग ग्रोटोज २५३ गुफा आणि ५१ हजार बुद्ध मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. या वर्षी २००१ मध्ये यूनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून या ठिकाणाला मान्यता दिली आहे. येथे प्रतिवर्षी लाखो पर्यटक येतात. २०२३ मध्ये जवळपास ३० लाख पर्यटक आले होते.

युंगांग ग्रोटोजमधील एका स्टाफ सदस्याने सांगितले की, यावर्षी १ मे पासून टॉयलेट टायमरचा उपयोग केला जात आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर याबाबत प्रश्नही उपस्थित केला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, या तंत्रज्ञानासाठी जितक्या निधीचा वापर केला गेला, त्या पैशात अतिरिक्त शौचालयांचे निर्माण चांगल्या पद्धतीने केले गेले असते. हा पैसा त्याठिकाणी वापरता आला असता.

WhatsApp channel
विभाग