चीनला दणका! भारतानंतर आता अमेरिकेतही टीकटॉकवर बंदी! हेरगिरीच्या शक्यतेनं घेतला निर्णय
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चीनला दणका! भारतानंतर आता अमेरिकेतही टीकटॉकवर बंदी! हेरगिरीच्या शक्यतेनं घेतला निर्णय

चीनला दणका! भारतानंतर आता अमेरिकेतही टीकटॉकवर बंदी! हेरगिरीच्या शक्यतेनं घेतला निर्णय

Jan 19, 2025 04:03 PM IST

Tik Tok Ban USA : भारतानंतर आता अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांना हे अ‍ॅप वापरता येणार नाही.

चीनला दणका! भारतानंतर आता अमेरिकेतही टीक-टॉकवर बंदी! हेरगीरीच्या शक्यतेने घेतला निर्णय
चीनला दणका! भारतानंतर आता अमेरिकेतही टीक-टॉकवर बंदी! हेरगीरीच्या शक्यतेने घेतला निर्णय

Tik Tok Ban USA : भारतानंतर आता अमेरिकेने चीनला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेने शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. या बाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. या बंदीमुले अमेरिकेतील नागरिक या लोकप्रिय शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. अनेक महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याच्या कायद्याला मंजुरी दिली.

रिपोर्टनुसार, टिकटॉक वापरकर्त्यांना अमेरिकेत अ‍ॅप उघडताना हा संदेश दिसत आहे. "अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणारा कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिक यापुढे टिकटॉक वापरू शकणार नाहीत. आम्हाला आशा आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सत्तेत आल्यावर ते ही बंदी उठवून पुन्हा आमच्या सोबत मिळून काम करतील. त्यामुळे प्लीज सोबत रहा."

अमेरिकेने टिकटॉकवर बंदी का घातली?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांनी टिकटॉक अ‍ॅप बद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच दावा केला की यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे. चीन सरकार या अ‍ॅपचा वापर अमेरिकन नागरिकांची हेरगिरी करण्यासाठी किंवा गुप्तपणे लोकमतावर प्रभाव टाकण्यासाठी करत आहे. या सोबतच काय दाखवायच आणि काय नाही यावर देखील चीन नियंत्रण ठेवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ही चिंता चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांमुळे उद्भवली आहे. चीनी कंपन्यांना या कायद्यानुसार गुप्त माहिती मिळवण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांना मदत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. एफबीआयचे संचालक ख्रिस्तोफर रे यांनी गेल्या वर्षी काँग्रेसला सांगितले होते की, टिकटॉकच्या सॉफ्टवेअरद्वारे चीन सरकार अमेरिक नागरिकांच्या फोन डिव्हाइसमध्ये प्रवेश मिळवून गुप्त माहिती चोरण्याची शक्यता आहे.

या भीतीमुळे अमेरिकेत देखील टिक टॉकवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. अखेर हा कायदा समंत केला आहे. तसेच जोपर्यंत चिनी मूळ कंपनी बाइटडान्स अमेरिकन सरकारने मंजूर केलेल्या खरेदीदाराला टिकटॉक विकत नाही तो पर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एप्रिल २०२४ मध्ये या कायद्यावर स्वाक्षरी केली आणि टिकटॉक विकण्यासाठी बाइटडान्सला १९ जानेवारीपर्यंतची मुदत दिली. मात्र, या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्याचा बाइटडान्स कंपनीने प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश मिळाले नाही.

६ डिसेंबर रोजी तीन फेडरल न्यायमूर्तींच्या पॅनेलने टिक-टॉकच्या विरोधात एकमताने निकाल दिला आणि या कायद्यामुळे पहिल्या दुरुस्तीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन झाल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाने १७ जानेवारी रोजी टिक-टॉकचे अपील दावा फेटाळून लावला. त्यामुळे १९ जानेवारीपासून अमेरिकेत टिक-टॉकवर बंदी लागू झाली झाली आहे.

टिकटॉकसाठी पुढे काय

अमेरिकेत टिकटॉकचे भवितव्य अनिश्चित आहे. कालांतराने, हे अ‍ॅप बंद पडणार आहे. करण नवीन कायद्यानुसार अ‍ॅपल आणि गुगलसारख्या अ‍ॅप स्टोअरचे अपडेट आणि सपोर्ट ब्लॉक केला जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेतून हे अ‍ॅप पूर्णपणे हद्दपार होणार आहे. सध्या सर्वांच्या नजरा नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लागल्या आहेत. नुकत्याच एनबीसीला दिलेल्या निवेदनात ट्रम्प यांनी टिकटॉकची परिस्थिती धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. संभाव्य टिकटॉक बंदी ९० दिवसांसाठी मागे घेण्याची योजना असल्याचे देखील ट्रम्प म्हणाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर