म्हणतात ना ज्याला देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्यय उत्तराखंड राज्यातील रामपूरमध्ये आला आहे. येथील १७ वर्षीय मुलगा अंकितवर वाघाने हल्ला केला होता. अंकितने दुर्दम्य साहस दाखवत वाघाचा सामना केला व आपले जीवन वाघाच्या जबड्यातून वाचवले. अंकितच्या प्रतिकाराने वाघ मागे हटला व जंगलात पळून गेला. जखमी अंकितला लोकांना रुग्णालयात दाखल केले. त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला ऋषिकेश एम्समध्ये हलवण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्याला दिल्ली एम्समध्ये पाठवण्यात आले आहेत. मात्र त्याचे नातेवाईक त्याला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले. तेथे चार महिने त्याच्यावर उपचार केल्यानंतर आज अंकित पूर्णपणे बरा झाला आहे.
अंकितने सांगितले की, तो उत्तराखंड राज्यातील रामपूरमधील रहिवासी आहे. तो १० वीच्या वर्गात शिकतो. २ नोव्हेंबर २०२३ रोजी तो नेहमीप्रमाणे शाळेतून घरी पायी येत होता. तेव्हा रस्त्यात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला. त्याची मान वाघाने पकडली होती. वाघाने अंकितचे डोके आपल्या जबड्यात पकडल्यानंतर संधी मिळताने अंकितने वाघाची जीभ पकडली व जोरात ओढली. जवळपास १५ मिनिटे चाललेल्या संघर्षानंतर वाघ मागे हटला व अंकितला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून जंगलात पळून गेला. या हल्ल्यात त्याचा चेहरा, मान, कवटी आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अंकितने सांगितले की, त्याच्यासोबत जात असलेल्या व्यक्तीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र अंकितने मृत्यूशी संघर्ष करून अनेक लोकांचा जीव वाचवला.
घटनेनंतर लोकांनी याची माहिती त्याच्या कुटूंबीयांना दिली. त्याला घेऊन हल्द्वानीमधील एका रुग्णालयात गेले. तेथून त्याला एम्सला रेफर करण्यात आले. आरोप केला जात आहे की, डॉक्टरांनी खूपच बेजबाबदारपणे त्याच्या डोक्याला टाके घाचले. मात्र वाघाशी दोन हात करताना झाडाच्या फांद्याचे तुकडे, पाने त्याच्या डोक्यात गेले होते ते काढलेच नव्हते. यामुळे त्याच्या शरीरात इंफेक्शन होऊ लागले. याचा व्हिडिओ अंकितच्या एका नातेवाईकाला गुडगावमध्ये मिळाला तेव्हा त्याचा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केला गेला. अंकित बचावल्यामुळे लोक त्याच्या शौर्याचे कौतुक करत आहेत.