Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवाशांची तुफान गर्दी; प्रवाशांमध्ये गोंधळ, VIDEO झाला व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवाशांची तुफान गर्दी; प्रवाशांमध्ये गोंधळ, VIDEO झाला व्हायरल

Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवाशांची तुफान गर्दी; प्रवाशांमध्ये गोंधळ, VIDEO झाला व्हायरल

Jun 14, 2024 11:04 PM IST

Vande Bharat Crowd : वंदे भारत एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवाशांची तुफान गर्दी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर रेल्वे प्रशासनाने प्रतिक्रिया दिली आहे.

A screengrab of the viral video showing the overcrowded coach. (Sourced)
A screengrab of the viral video showing the overcrowded coach. (Sourced)

प्रीमियम वंदे भारत एक्स्प्रेसच्या खचाखच भरलेल्या डब्यात विनातिकीट प्रवासी उभे राहून जागा मिळवण्यासाठी धडपडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या एका कोचमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या व्हिडिओवर भारतीय रेल्वेने प्रतिक्रिया दिली आहे. अर्चित नागर नावाच्या एका एक्स यूजरने एक क्लिप शेअर केला आहे. त्यानंतर दुसऱ्या अकाउंट @IndianTechGuide द्वारे रिशेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ एक्सवर व्हायरल झाला असून १ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. रेलवे सेवाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अर्चित नागर या एक्स युजरने तसेच इंडियन टेक अँड इन्फ्रा या अकाऊंटने ही शॉर्ट क्लिप शेअर केली आहे. रेल्वे सेवेने म्हटले की, आम्ही ऐकत आहोत आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू. संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

५ सेकंदाच्या क्लिपमध्ये दिसते की, अनेक प्रवाशी वंदे भारत कोचमध्ये उभे आहेत. व्हिडिओ बनवताना ही ट्रेन लखनऊमध्ये उभी होती. लोकांनी खचाखच भरलेल्या कोचमध्ये लोक जागा मिळवण्यासाठी धडपडत होते. यामुळे बोगीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रवाशांच्या सहायतेसाठी अधिकृत अकाउंट, रेलवे सेवा ने या पोस्टवर म्हटले की, आम्ही ऐकत आहोत व मदत करण्याचा प्रयत्न करू. पोस्टमध्ये उत्तर रेल्वेच्या लखनऊ डिवीजनच्या विभागीय व्यवस्थापकास एक्स अकाउंटवर टॅग केले होते.

या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स भडकले आणि व्हिडिओवर कमेंट करताना म्हणाले की, या प्रवाशांना दंड ठोठावला पाहिजे. एका युजरने म्हटले की, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कमीत कमी १ लाख रुपये दंड ठोठावला पाहिजे. अशाच प्रकारचे दृष्य अन्य ट्रेनमध्ये पाहिले गेले आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने बोगी खचाखच भरल्याचे व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

उत्तर पूर्व रेल्वे, लखनौ विभागाचे जनसंपर्क अधिकारी महेश गुप्ता यांनी सांगितले की, "हा व्हिडिओ ९ जूनच्या सकाळचा आहे, डेहराडूनला जाण्यासाठी रविवारी लखनौ जंक्शनवर ट्रेन उभी असताना प्रवासी ट्रेनमध्ये चढले होते. रेल्वे अधिकारी आणि आरपीएफने त्यांना रवाना होण्यापूर्वीच उतरवले. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाची गैरसोय झाली नसून गाडी वेळेवर रवाना झाली.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर