मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : तीन विद्यार्थ्यांनी एकाचवेळी केलं प्रपोज; संतापलेल्या शिक्षिकेनं दिली पोलिसांत तक्रार

Viral News : तीन विद्यार्थ्यांनी एकाचवेळी केलं प्रपोज; संतापलेल्या शिक्षिकेनं दिली पोलिसांत तक्रार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 12:32 PM IST

UP Crime News : गेल्या अनेक दिवसांपासून तिन्ही टवाळखोर विद्यार्थी महिला शिक्षिकेवर अश्लिल टिप्पणी करत होते. अखेर त्यांनी प्रपोज केल्यानंतर शिक्षिकेचा संयम सुटला.

Meerut Crime News Marathi
Meerut Crime News Marathi (HT)

Meerut Crime News Marathi : शाळा किंवा कॉलेजमध्ये छेडछाडीच्या किंवा अपहरणाच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. काही विद्यार्थी वर्गात टवाळखोरी करत असल्याचेही अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. परंतु वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी एकाचवेळी महिला शिक्षिकेला प्रपोज केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमधील राममनोहर लोहिया इंटर कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून त्यानंतर आता शिक्षिकेच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील राममनोहर लोहिया इंटर कॉलेजमधील काही विद्यार्थी सातत्यानं एका महिला शिक्षिकेवर अश्लिल टिप्पणी करत होते. गेल्या काही दिवसांपासून शिक्षिका या सर्व प्रकाराला कंटाळलेली होती. परंतु या टवाळखोर विद्यार्थ्यांनी सर्व हद्द पार करत थेट शिक्षिकेलाच प्रपोज केलं. त्यानंतर या प्रकाराचा व्हिडिओ शूट करून त्याला सोशल मीडियावरही व्हायरल केलं. सुरुवातीला शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या या आक्षेपार्ह वर्तनाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. परंतु प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं दिसताच तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनीही तीन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार...

आरोपी विद्यार्थी हे सातत्यानं महिला शिक्षिकेवर अश्लिल टिप्पणी आणि टॉंटबाजी करत होते. गेल्या काही दिवसांपासून आरोपी विद्यार्थी सातत्यानं वर्गात लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन करत होते. याशिवाय त्यांनी शिक्षिकेसोबत केलेल्या गैरवर्तनाचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं आता पोलिसांकडून तिघांनाही अटक होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाविद्यालय प्रशासनानंही या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

IPL_Entry_Point