मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IIT BHU Rape: आयआयटी बीएचयू सामूहिक बालत्कारातील आरोपी भाजप आयटी सेलचे? पक्षाकडून भूमिका स्पष्ट!

IIT BHU Rape: आयआयटी बीएचयू सामूहिक बालत्कारातील आरोपी भाजप आयटी सेलचे? पक्षाकडून भूमिका स्पष्ट!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Dec 31, 2023 11:47 PM IST

IT BHU Rape Case Updates: आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

IIT BHU Rape Case
IIT BHU Rape Case

IIT BHU Rape Case News: आयआयटी बीएचयूमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातीत तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली . याप्रकरणातील तिन्ही आरोपी भाजप आयटी सेल संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या तिघांचे स्थानिक भाजपा नेते, आयटी सेलचे प्रमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांबरोबरचे फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. यानंतर भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बीएचयूमध्ये सामूहिक बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी भाजप आयटी सेल संबंधित आहेत. त्यामुळे भाजप विरोधी पक्षांच्या टीकेच्या केंद्रस्थानी आहे. विरोधी पक्षांच्या वाढत्या दबावानंतर भाजपाने या तिन्ही तरुणांवर पक्षांतर्गत कारवाई केली. भाजपने तिन्ही आरोपींना पक्षातून निष्कासित केले आहे. भाजप वाराणसी जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा म्हणाले की, “एका गुन्ह्यात तिघांची नावे समोर आली आहेत. या पक्षाने तिघांविरोधात कारवाई केली. पक्षाच्या आदेशानुसार, या तिघांनाही पक्षातून निष्कासित केले. याप्रकरणी पक्ष जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.”

मिळालेल्या माहितीनुसार, आयआयटी बीएचयूमध्ये न्यू गर्ल हॉस्टेलमधील एक विद्यार्थिनी तिच्या एका मित्रासह १ नोव्हेंबरला रात्री दीड वाजताच्या सुमारास शतपावली करण्यासाठी निघाली. त्याचवेळी एका दुचाकीवरून तीन अज्ञात तरुण आयआयटीच्या कॅम्समध्ये घुसले. त्यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना वेगळे केले. त्यानंतर या तरुणांनी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, अभिषेक चौहान, कुणाल पांडे आणि सक्षम पटेल अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींची नावे आहेत.

कुणाल पांडेचे वडील जितेंद्र पांडे यांचे निधन झाले. त्यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. मात्र, तो बेरोजगार आहे.आनंद उर्फ ​​अभिषेक चौहानचे वडील मुन्ना पॉवरलूम चालवतात. आनंद दहावी पास आहे. सक्षमचे वडील विजय पटेल हे खासगी नोकरी करतात. तो इंटरमिजिएट उतीर्ण आहे. तिघेही एकत्र राहतात आणि बीएचयू येथे रात्री फिरायला जात असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

WhatsApp channel

विभाग