canada waiter job viral video : परदेशात जावे उच्च शिक्षण घ्यावे व तेथेच रोजगार करावा अशी भारतातील बहुतांश तरुणांची इच्छा असते. मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण आज परदेशात शिक्षणासाठी जात आहे. यात कॅनडामध्ये जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, लाखो रुपये खर्चून परदेशात जाऊन देखील चांगली नोकरी मिळत असल्याने अनेक भारतीय तरुण बेरोजगार अवसल्याचं भीषण वास्तव पुढं आलं आहे. कॅनडामधील उच्च शिक्षित भारतीय तरुणांना रोजगार नसल्याने त्यांनी चक्क एका हॉटेलमध्ये वेटरचा जॉब मिळवण्यासाठी रांगा लावल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
कॅनडामध्ये एका रेस्टॉरंटमध्ये वेटरच्या नोकरीसाठी अनेकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यात भारतीय तरुणांची संख्या मोठी होती. दोन दिवसांत ३ हजारांपेक्षा जास्त तरुणांनी हा जॉब मिळवण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे असलेल्या 'तंदूरी फ्लेम' या रेस्टॉरंटने वेटर आणि सर्व्हेंटच्या पदासाठी नोकरीची जाहिरात काढली होती. या ठिकाणी नोकरी मिळावी या हेतूने मोठ्या प्रमाणात तरुणांनी अर्ज केले होते. यात बहुतांश भारतीय तरुण होते. या दोन्ही पदासाठी तब्बल ३ हजार पेक्षा जास्त लोक मुलाखतीसाठी आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत नोकरीच्या लाईनमध्ये थांबलेले भारतीय दिसत आहेत. तसेच त्यांनी काम मिळवण्यासाठी व त्यांची सध्याची परिस्थिती देखील वर्णन केली आहे.
कॅनडा सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या परमीटमध्ये ३५ टक्के कपात करण्याच्या निर्णय घेतला आहे. या पूर्वी ही प्रक्रिया सुलभ असल्याने स्टुडंट व्हिसाच्या माध्यमातून वर्क परमिट, कायमस्वरूपी वास्तव्य व नंतर नागरिकत्व मिळवणे सोपे होते. मात्र, कॅनडाने अलीकडेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा ३५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची घोषणा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो यांनी केली आहे.
संबंधित बातम्या