Viral News: भारतातील 'या' गावात लोक शूज किंवा चप्पल घालणे टाळतात, नेमकं कारण काय? वाचा-this village in india does not allow people to wear shoes slippers because ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News: भारतातील 'या' गावात लोक शूज किंवा चप्पल घालणे टाळतात, नेमकं कारण काय? वाचा

Viral News: भारतातील 'या' गावात लोक शूज किंवा चप्पल घालणे टाळतात, नेमकं कारण काय? वाचा

Sep 03, 2024 10:10 AM IST

Tamil Nadu Viral Story: भारतात असे कोणते गाव आहे, जिथे लोक चप्पल घालत नाही आणि त्यामागचे कारण काय आहे? हे जाणून घेऊयात.

भारतातील 'या' गावात लोक शूज किंवा चप्पल घालणे टाळतात
भारतातील 'या' गावात लोक शूज किंवा चप्पल घालणे टाळतात

Tamil Nadu News: वीज आणि पाणी नसलेल्या भारतातील अनेक गावाबद्दल आपण ऐकले असेल. परंतु, तु्म्हाला माहिती आहे का, आपल्या देशात असे एक गाव आहे, जिथे लोक शूज किंवा चप्पलचा वापर नाही. हे गाव नेमके आहे कुठे आणि या गावातील लोक पायात चप्पल का घालत नाहीत, त्यामागचे कारण जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर अंदमान नावाचे एक गाव आहे. या गावातील बहुतांश लोक चप्पल घालत नाहीत. मुले चप्पलशिवाय शाळेत जातात. तर, बहुतेक लोक चप्पल न घालताच शेतात काम करताना दिसतात. कितीही कडक उन्ह असले तरी ते चप्पल घालणे टाळतात. काही वयोवृद्धांच्याच पायात चप्पल पाहायला मिळते. असेही काही लोक आहेत, जे गावाची वेस ओलांडल्यानंतर पायात चप्पल घालतात आणि पुन्हा गावात आल्यानंतर चप्पल काढतात.

जाणून घ्या कारण

या गावातील गावातील लोकांचा असा विश्वास आहे की, मुथ्यालम्मा नावाच्या देवीने त्यांचे आणि गावाचे रक्षण केले आहे. या गावातील लोक त्यांची मनापासून पूजा करतात. गावात मुथ्यालम्मा देवीचे वास्तव्य आहे, असे मानले जाते म्हणूनच गावकरी चप्पल आणि बूट घालत नाहीत. या गावात बाहेरून कोणी आले की, गावकरी मुथ्यालम्मा देवीबद्दल सांगतात. हे ऐकल्यानंतर अनेकजण आपल्या पायातील चप्पल काढतात. पण कोणी तयार नसेल तर, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला जात नाही.

मार्च- एप्रिल महिन्यात करतात पूजा

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च- एप्रिल महिन्यात तीन दिवस ग्रामदेवतेची पूजा केली जाते. मुथ्यालम्मा देवी काली मातेचे रूप आहे. हैदराबादमध्ये त्यांची शेकडो मंदिरे आहेत. तेलंगणा राज्यात महाकाली उत्सवादरम्यान आषाढ महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते. बोलारम आणि सिकंदराबाद येथे दर आठवड्याच्या शेवटी मोठा उत्सव साजरा होतो.

विभाग