जगाच्या अनेक भागांत काही देशांमध्ये जमिनीसाठी लढाई सुरू आहे. सध्या पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यात सर्वात मोठी लढाई सुरू असून यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. पण इस्रायलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असा भूभाग आहे ज्यावर कोणत्याही देशाला कब्जा करायचा नाही. खरं तर आम्ही बोलत आहोत इजिप्त आणि सुदानच्या सीमेदरम्यान वसलेल्या बीर तविल नावाच्या एका भागाबद्दल. या वाळवंटी भागावर ना सुदान किंवा इजिप्त देशाने दावा केलेला नाही.
गेल्या ६० वर्षांत हा प्रदेश आंतरराष्ट्रीय नेत्यांसाठी आव्हान बनला आहे. सहारा वाळवंटाच्या ईशान्येकडील २,०६० चौरस किलोमीटर क्षेत्राला भटक्या लोकांनी बीर तविल असे नाव दिले आहे, ज्याचा अरबी भाषेत अर्थ उच्च पाणी असलेला विहीर असा होतो.
सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, एकीकडे शेजारच्या जमिनीच्या एका छोट्या भागासाठी एवढं मोठं युद्ध सुरू असताना इजिप्त, सुदान किंवा इतर कुठल्याही देशाला ही रिकामी जमीन काबीज का करायची नाही? खरं तर यामागचं कारणही ब्रिटन आणि त्याने विसाव्या शतकात आखलेल्या सीमारेषा आहेत. एकेकाळी हा सगळा प्रदेश ब्रिटनच्या ताब्यात होता, ब्रिटन आणि तत्कालीन सुदान सरकार यांच्यात १८९९ मध्ये झालेल्या सीमा करारात सीमारेषा आखण्यात आली होती. ब्रिटन बाहेर पडल्यानंतर लगेचच या भागात तणाव निर्माण होऊ लागला, परंतु १९०२ मध्ये इजिप्त आणि सुदान यांच्यात आणखी एक सीमा करार झाल्यानंतर या भागावरील वाद आणखी वाढला. या दोन सीमा करारांमुळे बीर तविल असा प्रदेश बनला की एखाद्या देशाने त्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला तर तो मोठ्या भागावरील (हलाब त्रिकोण)आपला हक्क गमावेल.
बीर ताविल हा दुष्काळी भाग असल्याने येथील जमिनीत ना खनिजे आहेत ना ही जमीन सुपीक आहे. त्यामुळे सुदान किंवा इजिप्त या पैकी कोणालाही हा भाग आपल्या देशात समाविष्ट करायचा नाही. वनस्पती आणि लोकसंख्या नसलेल्या या वाळवंटाचा वाद न सुटलेलाच रहावा, असे दोन्ही देशांनी मानले आहे.
जेव्हा दोन्ही देशांनी या वाळवंटी प्रदेशाचा वाद न सुटण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी त्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. २०१४ मध्ये व्हर्जिनियाच्या एका शेतकऱ्याने बीर ताविलमध्ये झेंडा रोवला आणि स्वत:ला उत्तर सुदान राज्याचे गव्हर्नर घोषित केले. आपल्या मुलीने राजकुमारी व्हावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी आपला झेंडा बनवून इथेच रोवला. पण त्यांचा दावा फेटाळण्यात आला. या घटनेनंतर तीन वर्षांनी म्हणजे २०१७ मध्ये इंदूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने या ठिकाणाला आपला देश म्हणून घोषित केले आणि या ठिकाणाला 'किंगडम ऑफ दीक्षित' असे नाव दिले. त्याने स्वत:ला इथला राजा घोषित करून आपल्या वडिलांना या देसाचे पंतप्रधान बनवले.
या दोघांव्यतिरिक्त आणखी ही अनेकांनी या ठिकाणाला आपला देश बनवण्याचा प्रयत्न केला. पण सहारा वाळवंटातील या जागेबरोबर असे करणे भटकंतीच्या उद्देशाने करण्यात आले होते. दुष्काळामुळे कोणत्याही देशाला या क्षेत्रात रस नाही.
संबंधित बातम्या