Viral News : हैदराबादमधील एका कॅब ड्रायव्हरने गाडीत बसणाऱ्या प्रवाशांसाठी खास नियमावली तयार केली आहे. ही नियमावली त्याने गाडीच्या मागच्या सीटवर लावली आहे. अनेक तरुण जोडपी गाडीत बसूनच रोमान्स करत असल्याने हा कॅब ड्रायव्हर भडकला असून त्याने गाडीत बसतांना प्रवाशांना सौजन्याने बसण्याचा सल्ला दिला आहे. कॅब ड्रायव्हरची ही नियमावली सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या चिठ्ठीत त्याने मागच्या सीटवर रोमान्स करण्यास त्याने मनाई केली आहे. ड्रायव्हरने आपल्या प्रवाशांना उद्देशून लिहिलं आहे की, ही कॅब आहे, ओयो हॉटेल रूम नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेला हा फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला असून अनेकांचे मनोरंजन करणारा देखील ठरला आहे. नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. काही वेळातच हजारो जणांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेन्ट देखील केल्या आहेत.
इशारा!!
कॅबचलकाच्या या नियमावलीवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, ओयो रूम्सला आता अशी प्रतिष्ठा मिळाली आहे की ते रोमान्स करण्याचे ठिकाण झाले आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ओयो हॉटेलच्या उत्पन्नाचा हा एकमेव स्त्रोत आहे.
आणखी एका सोशल मीडिया यूझरने लिहिले आहे की, कॅब ड्रायव्हरला वाटते की स्त्रिया त्याच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकत नाहीत. तर दुसऱ्याने कॅब प्रवाशांसाठी एक नैतिक आणि आवश्यक संदेश असल्याचं लिहिलं आहे. तर आणखी एकाने, अरे वाह. बंगळुरू आणि दिल्लीत असे नियम मी पाहिले मात्र, हे हैदराबादमध्ये एवढ्या लवकर येईल हे अपेक्षित नव्हते.
गेल्या आठवड्यात अशीच एक नियमावली दाखवणारी पोस्ट व्हायरल झाली होती. बेंगळुरूमधील एका कॅब ड्रायव्हरने कॅबमधून प्रवास करताना प्रवाशांसाठी सहा नियम सांगितले होते. ड्रायव्हरला 'भैय्या' न म्हणण्यापासून ते प्रवास करतांना शांत राहणे व कारचा दरवाजा हळुवारपणे बंद करणे आणि विनम्र वर्तन राखणे अशी नियमावली कॅबचालकाने तयार केली होती.
शेजाऱ्याच्या बायकोवर जडला जीव, पळवून नेली दिल्लीला; विवाहितेच्या पतीने तरुणाच्या वडिलांची केली हत्या