जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे ३३०० कोटींचा मालक; फिरण्यासाठी खासगी विमान अन् आलिशान BMW कार-this dog will defeat even big personalities wealth worth rs 3300 crore also owner of private plane and bmw ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे ३३०० कोटींचा मालक; फिरण्यासाठी खासगी विमान अन् आलिशान BMW कार

जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे ३३०० कोटींचा मालक; फिरण्यासाठी खासगी विमान अन् आलिशान BMW कार

Sep 03, 2024 02:25 PM IST

world richest dog Gunther VI : गुंथर VI हा जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा आहे. जातीने जर्मन शेफर्ड असलेल्या गुंथरकडे ३,३०० कोटी रुपयांची मालमत्ता, खासगी विमान, खासगी बोटी, बीएमडब्ल्यू कार आहे. तसेच त्याच्या देखभालीसाठी २७ लोकांचा स्टाफ आणि एक विशेष शेफ कामाला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा! ३३०० कोटींचा आहे मालक; फिरण्यासाठी खाजगी विमान अन् आलीशान BMW कार; वाचून व्हाल हैराण
जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा! ३३०० कोटींचा आहे मालक; फिरण्यासाठी खाजगी विमान अन् आलीशान BMW कार; वाचून व्हाल हैराण

world richest dog Gunther VI : जगात अनेक नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे. मात्र, यातील अनेकांना एका श्वानाने संपत्तीच्या बाबतीत माग टाकलं आहे. हो हे खरं आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसला असेल. मात्र, जगात असा एक असे श्वान आहे की ज्याची संपत्ती ३,३०० कोटी रुपये आहे.

जातीने जर्मन शेफर्ड असलेल्या या श्वानाचे नाव गुंथर-VI आहे. गुंथर हा श्वान जगातील सर्वात श्रीमंत श्वान ठरला आहे. त्याच्या या संपत्तीमुळे त्याचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. गुंथर या श्वानाकडे खासगी विमान, बोट या सोबतच फिरण्यासाठी बीएमडब्ल्यू कारसह आलिशान वस्तू आहेत. याशिवाय त्याच्या आराम आणि देखभालीसाठी २७ जणांचा स्टाफही नेमण्यात आला आहे. गुंथर साठी एक खास शेफ देखील ठेवण्यात आला असून तो त्यासाठी स्वादिष्ट जेवण तयार करतो.

गुंथरच्या श्रीमंतीचा प्रवास हा १९९९ मध्ये सुरू झाला. त्याच वर्षी कार्लोटा लिबेन्स्टाईन नावाची श्रीमंत स्त्री मरण पावली. तिने आपली संपूर्ण संपत्ती गुंथर ३ नावाच्या श्वानाच्या नावावर केली. गुंथर ३ च्या मालमत्तेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तिचा इटालियन मित्र मॉरिझियो मियांवर सोपवण्यात आली होती. मियांनी कुशलतेने या संपत्तीची गुंतवणूक व विस्तार केला, ज्यामुळे गुंथर ६ ला गुंथर ३ च्या नावाची प्रचंड संपत्ती मिळाली.

गुंथर-VI च्या संपत्तीमध्ये केवळ खाजगी विमान आणि नौकाच नाही तर त्याच्याकडे इतर सुखसोयी देखील आहेत. २७ लोक यासाठी काम करतात, त्यापैकी काही त्याच्या दैनंदिन देखभाल आणि खानपानासाठी जबाबदार आहेत. विशेषत: शेफ त्याचा आवडता आणि खास आहार तयार करतो.

जगातील सर्वात श्रीमंत श्वान

गुंथर-VI च्या समृद्धीने त्याला एक वेगळी ओळख दिली आहे. हा जगातील सर्वात श्रीमंत कुत्रा तर आहेच, पण त्याच्या नावामुळे एवढी मोठी संपत्ती सांभाळण्याचा एक नवीन दृष्टिकोनही समोर आला आहे. गुंथर-VI ची ही अनोखी मालमत्ता आणि त्याच्याशी संबंधित विशेष व्यवस्थापनामुळे त्याला एक विशेष ओळख मिळाली आहे, त्यांच्या या संपत्तीने संपूर्ण जगाला थक्क केले आहे.