Trending News: आशियातील 'या' देशात चक्क भाड्यानं मिळते बायको; 'असा' केला जातो करार!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending News: आशियातील 'या' देशात चक्क भाड्यानं मिळते बायको; 'असा' केला जातो करार!

Trending News: आशियातील 'या' देशात चक्क भाड्यानं मिळते बायको; 'असा' केला जातो करार!

Nov 29, 2024 04:40 PM IST

Wives On Rent: आशिया खंडात असे एक देश आहे, जिथे चक्क बायको भाड्याने मिळते, ज्याची जगभरात चर्चा रंगली आहे.

आशियातील 'या' देशात चक्क भाड्यानं मिळते बायको
आशियातील 'या' देशात चक्क भाड्यानं मिळते बायको

Viral News: थायलंड आपल्या जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता येथे एक ट्रेंड झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे वाद सुरू झाला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण येथे लोक केवळ खोल्या, हॉटेल किंवा ऑफिसच नाही तर बायकादेखील भाड्याने खरेदी करू शकतात. हा ट्रेंड इथे 'ब्लॅक पर्ल' म्हणून ओळखला जातो. या प्रक्रियेला अनेकदा तात्पुरते लग्न असे म्हणतात. थायलंडमध्ये ही प्रथा इतकी रूढ झाली आहे की, नुकतेच या विषयावर येथे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे.

यामध्ये गरीब ग्रामीण महिला सहसा परदेशी पर्यटकांच्या साथीदार बनतात. पटायाच्या रेडलाईट जिल्ह्यातील बार आणि नाईट क्लबमध्ये ही प्रथा प्रचलित आहे. 'थाई टॅबू: द राइज ऑफ वाइफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी: एक्सप्लोरिंग लव्ह, कॉमर्स अँड कॉन्ट्रोव्हर्सी इन थायलंड वाइफ रेंटल फेनोमिन' हे पुस्तक या विषयाभोवती फिरते. थायलंडची ऐतिहासिक प्रथा पुन्हा एकदा उदयास येत असल्याचे या पुस्तकातून दिसून येते. विशेषत: ज्या तरुणांना नोकरी मिळणे अवघड जात आहे, त्यांच्यासाठी हा वादग्रस्त उद्योग उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणून उदयास आला आहे.

कसा केला जातो करार? वाचा

हे सर्व एका करारानुसार घडते. ही व्यवस्था काही दिवसांपासून अनेक महिन्यांपर्यंत चालते. या महिला प्रामुख्याने बार आणि नाईट क्लबमध्ये पर्यटकांना भेटतात. स्त्रीचे सौंदर्य, शिक्षण आणि वयाच्या आधारे पैसे ठरवले जातात. ही रक्कम १ हजार ६०० ते १ लाख १६ हजार डॉलरपर्यंत असू शकते. अनेकदा कालांतराने नातेसंबंध विकसित होतात, तेव्हा काही स्त्रिया आपल्या क्लायंटशी लग्नही करतात किंवा बराच काळ जोडीदार म्हणून काम करून पैसे कमवत राहतात.

थायलंड सरकारचे स्पष्टीकरण

थायलंडमध्ये सरोगेट बायकोची प्रथा हा एक व्यवसाय बनला आहे, जो जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्येही प्रचलित आहे. पटाया आणि इतर थाई शहरांना भेट देणारे परदेशी पर्यटक बऱ्याचदा बार, रेस्टॉरंट्स आणि नाईट क्लबसारख्या ठिकाणी थेट या महिलांशी संपर्क साधतात. परस्पर हितसंबंध असतील तर अटी ठरवण्यासाठी वाटाघाटी होतात. देशात अशी प्रथा सुरू असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कायदा नसल्याची कबुली थायलंड सरकारने दिली आहे. ही प्रथा जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांपासून प्रेरित आहे, जिथे अशा सेवा आधीच लोकप्रिय आहेत.

 

या व्यवसायाच्या वाढीमागचे कारणे

थायलंडमध्ये या व्यवसायाच्या वाढीमागे अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत. थायलंडमध्ये शहरीकरण आणि चांगल्या जीवनशैलीच्या इच्छेमुळे एकटेपणा वाढला आहे. व्यस्त जीवनात, लोकांना बर्याचदा चिरस्थायी संबंध तयार करण्यासाठी मर्यादित वेळ असतो, ज्यामुळे काही लोक तात्पुरते साथीदार शोधतात. पर्यटन स्थळ म्हणून थायलंडची लोकप्रियता बऱ्याच परदेशी अभ्यागतांना आकर्षित करतात.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर