BBC Exit Poll Viral video fact check : लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले असून सातवा आणि शेवटच्या टप्प्यासाठी लवकरच मतदान होणार आहे. दरम्यान, ४ जूनला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत 'बीबीसी'चा एक व्हिडिओ. चांगलाच व्हायरल होतो आहे. बीबीसीने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३४७ जागा आणि काँग्रेसला ८७ जागा दिल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये एक न्यूज अँकर इंग्रजीमध्ये या जागांचे नंबर देताना दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्सच्या मते हा 'बीबीसी'चा एक्झिट पोल असून हा व्हिडीओवर राहुल गांधी यांच्या विरोधात एक पोस्ट देखील लिहिण्यात आली आहे. यात "सत्यनाश बीबीसी, राहुलला यांना स्वप्नातही पंतप्रधान होऊ देणार नाही, किमान ४ तारखे पर्यंत तरी त्यांना मजा करू दिली असतीस." असे एकाने लिहिले आहे.
एक्सवर हा व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, "बीबीसीचा एक्झिट पोल." या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
हीच पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील शेअर केली गेली आहे. अशा पोस्टच्या संग्रहित आवृत्त्या येथे आणि येथे पाहता येतील.
दरम्यान आज तकच्या टीमने या व्हिडिओचे फॅक्ट चेक केले आहे. यात असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओ बीबीसीच्या एक्झिट पोलचा नाही. हा व्हिडिओ पाच वर्षे जुना आहे. व्हिडिओमध्ये अँकर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगत आहेत.
व्हायरल व्हिडिओचे मुख्य फ्रेम्स गूगलवर शोधण्यात आले. हा व्हिडिओ २३ मे २०१९ रोजी 'बीबीसी' न्यूजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला आढळला. या बातमीचे शीर्षक आहे, "भारताचे निवडणूक निकाल २०१९: मोदींचा मोठा विजय." या व्हायरल व्हिडिओचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी काहीही संबंध नाही हे येथे स्पष्ट झाले आहे.
ही बातमी पाहिल्यानंतर आजतकच्या टीमला कळले की त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल नमूद करण्यात आले आहेत. व्हायरल व्हिडिओ भाग 00:03 सेकंदापासून सुरू होतो. याआधी अँकर म्हणतो, "आतापर्यंतचे निकाल पाहू." व्हिडिओचा सुरवातीचा हा भाग व्हायरल व्हिडिओमधून काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कोणत्या निवडणुकीच्या निकालाचा आहे हे कळत नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आघाडीच्या एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसच्या युपीएला ९१ जागा मिळाल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात होते. बीबीसीच्या पाच वर्षे जुन्या वृत्ताच्या व्हिडिओला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल सांगून शेअर करत दिशाभूल केली जात आहे.
(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Aaj Takने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)