Mobile Showroom Robbery viral Video : देशात रोज कुठे ना कुठे चोऱ्या होत असतात. चोरीच्या या घटना व्हायरल होत असतात. चोरीची एक अशीच थरारक घटना व्हायरल झाली आहे. ही घटना दिल्ली येथील वसंत कुंज परिसरात घडली आहे. तीन चोरांनी पहाटेच्या वेळी मोबाईलच्या दुकानात शिरून अवघ्या चर मिनिटांत संपूर्ण दुकान लुटून पसार झाले. चोरीच्या या थरारक घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोबाईल दुकानातील चोरीची ही घटना दिल्लीतील सर्वांत पॉश परिसर असलेल्या वसंत कुंज भागात घडली आहे. २४ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता मोबाईलच्या दुकानात चोरी झाली. चोरटे दुकानातील लाखोंचे मोबाईल गोणीत भरून पसार झाले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये चोरट्यांनी कशी आणि किती वेळात चोरी केली ही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
मोबाईल शोरूममधील चोरीच्या व्हिडीओमध्ये एक चोर एक गोणी घेऊन शोरूममध्ये शिरल्याचे दिसत आहे. यानंतर चोरट्याचा एक साथीदारही त्याच्या मागोमाग येऊन दुकानात शिरतो. एक चोर फोन उचलतो आणि डेस्कवर ठेवतो आणि दुसरा चोर तो एका सॅकमध्ये ठेवू लागतो. काही वेळाने तिसरा चोरटाही शोरूममध्ये पोहोचतो आणि त्यानंतर तिघेजण मिळून सॅकमध्ये फोन भरू लागतात. अवघ्या चार मिनिटात गोणी भरली. दरम्यान, दूसरा चोर हा आणखी एक गोणी घेऊन आला. यानंतर, हे लोक वेगवेगळ्या फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू या गोणीत भरून काही वेळातच तिघेही चोरटे फोनची दोन पोती व इतर वस्तू चोरून पसार झाले.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत तिन्ही चोरट्यांनी चेहऱ्यावर रुमाल बांधलेले असल्याचं दिसत आहे. शोरूममध्ये शिरताच सर्व मोबाइल व इतर विद्युत उपकरे पोत्यात भरून हे चोरटे अवघ्या चार मिनिटांत हे दुकान लुटून फरार झाले. दुकानाचे शटर उचकातून चोरट्यांनी मोबाईल दुकानात प्रवेश केला. यातील एकाने गोणी काढली तर इतर दोघांनी दुकानातील वस्तु त्यात भरल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी दिल्लीतील पॉश भागातील वसंत कुंज साउथ येथील एका मोबाईल शोरूममध्ये घडली. चोरट्यांनी लाखो किमतीचे फोन एका गोणीत भरले आणि तेथून पळ काढला. चोरट्यांनी अवघ्या चार ते पाच मिनिटांत संपूर्ण शोरूम रिकामे करून लाखोंचे फोन लुटले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.