Viral Video: मंदिरात चोरी करण्याआधी केली देवाची पूजा, धार्मिक चोराचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: मंदिरात चोरी करण्याआधी केली देवाची पूजा, धार्मिक चोराचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: मंदिरात चोरी करण्याआधी केली देवाची पूजा, धार्मिक चोराचा व्हिडिओ व्हायरल!

Published Mar 21, 2024 11:17 AM IST

Rajasthan Temple Theft video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थानमधील अलवर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

राजस्थानच्या अलवर येथील एका मंदिरात चोरी करण्याआधी चोरट्याने देवाची पूजा केली.
राजस्थानच्या अलवर येथील एका मंदिरात चोरी करण्याआधी चोरट्याने देवाची पूजा केली.

Rajasthan Stealing Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. तर, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चोरी करण्यासाठी शिरलेला चोर आधी देवांची पूजा करतो. यानंतर मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरी करतो. एवढेच नव्हेतर, चोरी केलेले पैसे घेऊन जाताना हा चोर पुन्हा एकदा मंदिराची घंटा वाजवतो आणि देवासमोर हात जोडतो.हा संपूर्ण प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो.

या चोरीचा सीसीटीव्ही फुटेज मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @HateDetectors नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहितीही दिली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'राजस्थानमधील अलवरमध्ये एक व्यक्ती मंदिरातून पैसे आणि इतर महागड्या वस्तू चोरण्याआधी पूजा करताना सीसीटीव्हीमध्ये दिसली. गोपेश शर्मा असे या व्यक्तीचे नाव असून तो केवळ मंदिरांत चोरी करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने अनेक मंदिरात अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली. दिवसा मंदिरात कुठे काय आहे, याची पाहणी केल्यानंतर तो रात्री पुजारी निघून गेल्यावर मंदिरातील पैसे किंवा मौल्यवान वस्तू चोरून नेत असे, असेही त्याने पोलिसांना सांगितले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर