मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की...

Viral News : चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की...

Jun 27, 2024 12:41 PM IST

Viral News : पती पत्नी घरात असताना एक चोरटा घरात गुपचुप घुसला. त्याने पती पत्नीच्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ तयार केला. यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागला.

चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की...
चोरट्याने घरात घुसून पती-पत्नीच्या शरीर संबंधाचा तयार केला व्हिडिओ; मग केले असे काही की...

Viral News : स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने चोरीचा मार्ग निवडणाऱ्या एका तरुणाचे चोर होण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला भुरट्या चोरी करणारा आरोपी मोठ्या चोरीच्या उद्देशाने एका घरात घुसला. यावेळी पती पत्नी त्यांच्या खासगी क्षणाचा आनंद घेत असतांना चोरट्याने त्यांच्या शरीर संबंधांचा चोरून व्हिडिओ काढला. दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ पती पत्नीला पाठवून त्याने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. १० लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. अखेर पिडीत जोडप्याने पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. ही घटना दुर्ग जिल्ह्यातील आहे.

व्हिडिओ पाठवला व्हॉट्सॲपवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय कुमार साहू असे या आरोपीचे नाव आहे. त्याने पती-पत्नीचा गुपचूप अश्लील व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हिडिओ त्याने दाम्पत्याच्या मोबाइलवर पाठवला. यानंतर त्याने त्यांना ब्लॅकमेल करत १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. चोरी केलेल्या फोनने त्याने व्हिडिओ शूट केल्याने पोलिसांना त्याचा छडा लागत नव्हता. आरोपींनी व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ पाठवून जोडप्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकता आल्या.

ट्रेंडिंग न्यूज

स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने झाला चोर

तपासादरम्यान पोलिसांना कळले की, विनय कुमार साहू पूर्वी सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याने अनेकवेळा परीक्षा दिली देखील. मात्र, तो पास झाला नाही. मोठे अपयश आल्याने त्याने चोरी करून आपला उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. सुरवातीला त्याने आजूबाजूच्या लोकांचे मोबाईल चोरले. गेल्या शुक्रवारी मोठ्या चोरीच्या उद्देशाने तो एका जोडप्याच्या घरात घुसला. यावेळी चोरी करण्यासाठी सामानाची शोधा शोध करत असतांना त्याला पती-पत्नी दिसले. विनयने गुपचूप दोघांचा व्हिडिओ शूट केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो व्हिडिओ पती-पत्नीला पाठवला. तसेच फोन करून १० लाख रुपयांची मागणी केली. त्यांचा व्हिडिओ पाहून या जोडप्याला हादरा बसला. त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. आरोपीने १० लाख रुपये दिले नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांना त्यांनी दिली. याप्रकरणी दुर्ग पोलिसांनी विशेष पथक तयार केले. व बुधवारी पोलिसांनी आरोपी विनयला अटक केली. आरोपीच्या फोनवरून पती पत्नीचा खासगी व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर