Viral Video: आधी देवाची पूजा केली अन् मग चोरले लाखो रुपये, पेट्रोल पंपावरील चोरीचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: आधी देवाची पूजा केली अन् मग चोरले लाखो रुपये, पेट्रोल पंपावरील चोरीचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video: आधी देवाची पूजा केली अन् मग चोरले लाखो रुपये, पेट्रोल पंपावरील चोरीचा व्हिडिओ व्हायरल!

Dec 10, 2024 12:32 PM IST

Petrol Pump Theft Viral Video: पेट्रोल पंपावर चोरी करण्याआधी एका चोरट्याने देवाची पूजा केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ: आधी देवाची पूजा केली अन् मग चोरले लाखो रुपये!
व्हायरल व्हिडिओ: आधी देवाची पूजा केली अन् मग चोरले लाखो रुपये! (X/WebduniaHindi)

Viral News: मध्य प्रदेशातील राजगड मध्ये एका व्यक्तीने पेट्रोल पंपावर घुसून लाखो रुपयांची चोरी केली. पण चोरी करण्याआधी त्याने देवाची पूजा केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. 

हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, ज्यात एक व्यक्ती आपली ओळख लपवण्यासाठी स्वत:चा चेहरा कपड्याने झाकून पेट्रोल पंपाच्या कार्यालयात गुपचूप प्रवेश करतो. त्यानंतर दरवाजा सुरक्षितपणे बंद आहे का, याची खात्री करण्यासाठी मागे वळून बघतो. त्यावेळी त्याची नजर कोपऱ्यात असलेल्या एका लहानशा मंदिरावर पडते, ज्यात देवांचे फोटो आणि मूर्ती असते. हे पाहताच तो व्यक्ती चोरी करण्याआधी मंदिरासमोर आपले डोके टेकवतो. चोरीत यशस्वी होण्यासाठी त्याने असे कृत्य केले की, त्यामागे आणखी काही वेगळे कारण आहे, हे फक्त त्या व्यक्तीलाच ठाऊक आहे. 

मंदिरासमोर डोके टेकवल्यानंतर तो रोख रक्कम कुठे लपवली आहे, याचा शोध घेतो. यावेळी तो सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा देखील प्रयत्न करतो, जेणेकरून तो चोरी करताना रेकॉर्ड होऊ नये. परंतु, तसे करण्यात अपयशी ठरतो. त्यानंतर तो कार्यालयातील एक ड्रॉवर फोडतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने पेट्रोल पंपावरील सुमारे १ लाख ६० हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या वेळी पेट्रोल पंपाचे कर्मचारी झोपले होते. चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र, कर्मचाऱ्यांना चोराला पकडण्यात अपयश आले. पोलिसांनी कार्यालयातून लोखंडी रॉड आणि एक साडी जप्त केली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेचा व्हिडिओ अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्सवर पोस्ट केला आणि चोराने गुन्हा करत असतानाही थांबून प्रार्थना करण्याची भक्ती पाहून प्रभावित झालेल्या सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर