Trending: कोणीतरी आजारी, एका महिन्यात परत करेल; पैसे, सोने- चांदीचे दागिने चोरून चोरट्यानं मालकांसाठी सोडली चिठ्ठी!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Trending: कोणीतरी आजारी, एका महिन्यात परत करेल; पैसे, सोने- चांदीचे दागिने चोरून चोरट्यानं मालकांसाठी सोडली चिठ्ठी!

Trending: कोणीतरी आजारी, एका महिन्यात परत करेल; पैसे, सोने- चांदीचे दागिने चोरून चोरट्यानं मालकांसाठी सोडली चिठ्ठी!

Jul 04, 2024 10:30 PM IST

Tamil Nadu Thoothukudi Theft: तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यातील एका घरात चोरट्याने चोरी करून एका महिन्यात सर्वकाही परत करेल, अशी मालकासाठी चिठ्ठी लिहिली.

पैसे, सोने- चांदीचे दागिने चोरून चोरट्यानं मालकांसाठी सोडली चिठ्ठी
पैसे, सोने- चांदीचे दागिने चोरून चोरट्यानं मालकांसाठी सोडली चिठ्ठी (Unsplash)

Tamil Nadu News: तामिळनाडूच्या तुतीकोरिन जिल्ह्यातील एका घरात चोरी झाल्याची माहिती तामिळनाडू पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांचा शोध घेतला असता त्यांना रोख रक्कम व काही दागिने गायब झाल्याचे आढळून आले. मात्र, या संपूर्ण घटनेत चोरट्याची चिठ्ठी समोर आल्याचे वृत्त आहे.

निवृत्त शिक्षक चिथिराय सेल्विन (वय, ७९) यांच्या घरी ही घटना घडली. सेवानिवृत्त शिक्षक सेल्विन यांना पत्नी आणि चार मुले आहेत. चेन्नईत मुलाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य १७ जून रोजी भाड्याच्या मोलकरणीच्या देखरेखीखाली घराबाहेर पडले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री मोलकरीण घरी पोहोचली, तेव्हा तिला कोणीतरी आत शिरल्याचे तिच्या लक्षात येताच तिने पोलिसांना फोन करून माहिती दिली.

चोरट्याने ६० हजार रुपयांची रोकड, सोन्याच्या दोन जोड्या आणि चांदीचे दागिने चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरट्याने त्यांच्या राहत्या घरी एक चिठ्ठी ही ठेवली आणि लिहिले, "मला माफ करा. मी एका महिन्यात परत देईन. माझ्या घरात कोणीतरी आजारी आहे."

चीनच्या शांघायमध्येही घडली होती अशीच घटना

याआधी चीनच्या शांघायमध्ये एका व्यक्तीने एका दुकानात दरोडा टाकला होता आणि त्यानंतर मालकाने आपली चोरी विरोधी यंत्रणा अद्ययावत करण्याची विनंती करणारा मेसेज सोडला होता. संग या चोरट्याने इमारतीच्या बाहेरील भिंतीवर चढून आत प्रवेश केला आणि अ‍ॅपल मॅकबूक आणि घड्याळ घेतले. आत आल्यावर सांगने मोबाईल आणि लॅपटॉप गोळा केले, ते एका डेस्कवर ठेवले.

त्याने लिहिले की, "मी मनगटी घड्याळ आणि लॅपटॉप घेतला. आपण आपली चोरी विरोधी प्रणाली सुधारली पाहिजे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला फटका बसेल या भीतीने मी सर्व फोन आणि लॅपटॉप घेतले नाहीत. लॅपटॉप आणि फोन परत हवा असेल तर माझ्याशी संपर्क साधा, असेही तो म्हणाला. त्यानंतर पोलिसांनी चोरट्याने सोडलेला फोन नंबर आणि पब्लिक सर्व्हेलन्स कॅमेऱ्यांचा वापर करून त्याचा शोध घेतला. शांघायहून निघालेल्या ट्रेनमध्ये पकडले गेले, तेव्हा चोरीच्या वस्तू सांगकडेच होत्या. पोलिसांनी त्याला चोरीच्या वस्तूसह ताब्यात घेतले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर