दारूच्या दुकानात घुसला चोर; मनसोक्त दारू ढोसून झाला टल्ली अन् सकाळ होताच गेला पकडला
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दारूच्या दुकानात घुसला चोर; मनसोक्त दारू ढोसून झाला टल्ली अन् सकाळ होताच गेला पकडला

दारूच्या दुकानात घुसला चोर; मनसोक्त दारू ढोसून झाला टल्ली अन् सकाळ होताच गेला पकडला

Dec 31, 2024 08:54 PM IST

चोरट्याने आधी छताच्या टाइल्स काढून दुकानात प्रवेश करण्याचा बेत आखला, त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बंद केला आणि रोख रक्कम घेऊन दारूच्या बाटल्या घेऊन पळून जाण्याच्या तयारी केली मात्र दारु प्यायल्यामुळे तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला.

दारुच्या दुकानात टल्ली होऊन पडलेला चोर
दारुच्या दुकानात टल्ली होऊन पडलेला चोर

तेलंगणातील मेडक जिल्ह्यात असलेल्या एका दारूच्या दुकानात दरोडा टाकण्याची योजना एका चोरट्याने आखली होती. मात्र त्याचे दारूचे व्यसन त्याला चांगलेच अंगलट आले. दारूच्या व्यसनामुळे ही चोरी त्याला महागात पडली. येथे मद्यधुंद अवस्थेत बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका चोरट्याला पोलिसांनी अटक केली. ही घटना स्थानिक परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. चोरी केल्यानंतर चोर आनंदाने दारू प्यायला बसला आणि मद्यप्राशन केल्याने त्याचा संपूर्ण प्लॅन चव्हाट्यावर आला. अति दारू प्यायल्यामुळे तो दारूच्या दुकानाच टल्ली होऊन पडला.

सोमवारी सकाळी दुकानातील कर्मचाऱ्यांना चोर दारूच्या नशेत बेशुद्ध पडलेला दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या चोरट्याने आधी छताच्या टाइल्स काढून दुकानात प्रवेश करण्याचा बेत आखला, त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून रोख रक्कम घेऊन दारूच्या बाटल्या घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, चोरट्याला दारू पिण्यापासून स्वत:ला रोखता आले नाही.

दारूचा ठेका चालवणारे नरसिंग म्हणाले, रविवारी रात्री १० वाजता आम्ही दुकान बंद केले. सोमवारी सकाळी दहा वाजता दुकान उघडले असता चोर मद्यधुंद अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. छताच्या टाइल्स काढून आत प्रवेश केला आणि कॅश बॉक्समधून पैसे काढले. त्याच्या आजूबाजूला पैसे आणि दारूच्या बाटल्या विखुरलेल्या होत्या. चोरट्याच्या चेहऱ्यावर किरकोळ जखमही होती, जी चोरीच्या वस्तूंच्या धडकेमुळे झाली असावी.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो त्याच्या नशेतून बाहेर येण्याची पोलिसांनी बराच वेळ वाट पाहिली. सध्या चोरट्याचे नाव समजू शकले नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरट्याचे कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास पोलिस करत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर