Viral News : तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास! शिक्षा भोगण्यास एक नाही तर अनेक जन्मही पडतील कमी, नेमका काय गुन्हा केला?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास! शिक्षा भोगण्यास एक नाही तर अनेक जन्मही पडतील कमी, नेमका काय गुन्हा केला?

Viral News : तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास! शिक्षा भोगण्यास एक नाही तर अनेक जन्मही पडतील कमी, नेमका काय गुन्हा केला?

Published Feb 06, 2025 10:04 AM IST

Viral News : कुत्र्यांची बेकायदेशीर झुंज लावणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५७ वर्षीय व्हिन्सेंट लॅमार्क यांच्यावर १०० हून अधिक पिटबुल कुत्रे पाळण्याचा व त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता.

तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास! शिक्षा भोगण्यास एक नाही तर अनेक जन्मही पडतील कमी, नेमका काय गुन्हा केला?
तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास! शिक्षा भोगण्यास एक नाही तर अनेक जन्मही पडतील कमी, नेमका काय गुन्हा केला?

Viral News : भारतात नवी कायदा संहिता तयार करण्यात आली आहे. यात विविध गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दंड, तुरुंगावास ते कठोर शिक्षा म्हणून फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, अमेरिकेत कायदे वेगळे आहे. येथे एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याला तब्बल ४७५ वर्षांच्या कारावास ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी त्याला एक नाही तर अनेक जन्म देखील कमी पडणार आहे. 

अमेरिकेतील जॉर्जियामधील एका आरोपीला ही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागणार आहेत. बेकायदा कुत्र्यांची झुंज लावणाऱ्या व त्यांना त्यासाठी प्रशिक्षित करणाऱ्या  एका ५७ वर्षीय व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  व्हिन्सेंट लॅमार्क असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर १०० हून अधिक पिटबुल कुत्रे पाळण्याचा आणि त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे.  या ऐतिहासिक शिक्षेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना ? 

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, पॉल्डिंग काउंटी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा धक्कादायक तथ्य समोर आलं. कोर्टाने बुरेलला ९३ वेळा कुत्र्यांची झुंज लावल्या प्रकरणी दोषी ठरवलं, त्यापैकी प्रत्येक झूंझी मागे त्याला पाच वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे.  याशिवाय १० प्रकरणांमध्ये प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास प्रत्येक आरोपानुसार त्याच्या शिक्षेत  १ वर्षाची भर घालण्यात आली आहे. अशा प्रकारे त्याची एकूण शिक्षा ४७५ वर्षांवर पोहोचली, जी कुत्र्याच्या झुंझीसाठी जगभरात कोणत्याही व्यक्तीला सुनावलेली सर्वात मोठी शिक्षा मानली जाते.

या खटल्याचे मुख्य सरकारी वकील के. सी. पगनोटा म्हणाले, 'हा निकाल प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या सर्वांसाठी धोक्याचा इशारा आहे. समाजाने आता अशा अत्याचाराविरोधात उभे राहून अशा घटना  थांबवल्या पाहिजे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बुरेल यांचे वकील डेव्हिड हीथ यांनी सांगितले. हा निकाल पुराव्याच्या विरोधात असून त्याला पुन्हा आव्हान देण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे ते म्हणाले. ही शिक्षा सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेक नेटकऱ्यांनी या निर्णयाला अभूतपूर्व म्हटलं आहे. तर काहींनी त्याला चुकीच म्हटलं आहे. या शिक्षेची चर्चा सध्या अमेरिकेत होत आहे. तर सोशल मिडियामुळे हे प्रकरण संपूर्ण जगात पोहोचलं आहे . 

Ninad Vijayrao Deshmukh

TwittereMail

निनाद देशमुख हिंदुस्तान टाइम्स-मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट प्रोड्युसर म्हणून २०२२ पासून कार्यरत आहे. निनादने पुणे विद्यापीठातून एमए (जर्नलिझम) शिक्षण घेतले आहे. पुण्यातील केसरी वृत्तपत्रातून २००७ मध्ये बातमीदार म्हणून करियरची सुरूवात. २००९ ते २०२२ पर्यंत लोकमत, पुणे येथे वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केले. निनादला डिफेन्स, सायन्स, अंतराळ विज्ञान, आंतरराष्ट्रीय राजकारण विषयांची विशेष आवड आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर