एक नाही तर अनेक जन्मही कमी पडतील, व्यक्तीला तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास; काय होता गुन्हा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एक नाही तर अनेक जन्मही कमी पडतील, व्यक्तीला तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास; काय होता गुन्हा?

एक नाही तर अनेक जन्मही कमी पडतील, व्यक्तीला तब्बल ४७५ वर्षांचा तुरुंगवास; काय होता गुन्हा?

Feb 05, 2025 04:52 PM IST

बेकायदेशीर कुत्र्यांची झुंज लावणाऱ्या एका व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५७ वर्षीय व्हिन्सेंट लॅमार्क यांच्यावर १०० हून अधिक पिटबुल कुत्रे पाळण्याचा आणि त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता.

तब्बल पावणे पाचशे वर्षांचा कारावास!
तब्बल पावणे पाचशे वर्षांचा कारावास!

अमेरिकेतील जॉर्जियामधील एका व्यक्तीला अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे की, ती पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागतील. बेकायदा कुत्र्यांची झुंज लावणाऱ्या एका व्यक्तीला ४७५ वर्षांच्या तुरुंगवासाची विचित्र शिक्षा सुनावण्यात आली आहे. ५७ वर्षीय व्हिन्सेंट लॅमार्क यांच्यावर १०० हून अधिक पिटबुल कुत्रे पाळण्याचा आणि त्यांना लढण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप होता. या ऐतिहासिक शिक्षेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

कशी वाढत गेली शिक्षा?

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, पॉल्डिंग काउंटी कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा धक्कादायक तथ्य समोर आले. कोर्टाने बुरेलला ९३ वेळा डॉग फायटिंगप्रकरणी दोषी ठरवले गेले, त्यापैकी प्रत्येकाला पाच वर्षांची शिक्षा झाली. याशिवाय १० प्रकरणांमध्ये प्राण्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास प्रत्येक आरोपात १ वर्षाच्या शिक्षेची भर घालण्यात आली. अशा प्रकारे त्याची एकूण शिक्षा ४७५ वर्षांवर पोहोचली, जी कुत्र्याच्या लढाईसाठी कोणत्याही व्यक्तीला सुनावलेली सर्वात मोठी शिक्षा मानली जाते.

या खटल्याचे मुख्य सरकारी वकील के. सी. पगनोटा म्हणाले, 'हा निकाल प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या सर्वांसाठी धोक्याचा इशारा आहे. समाजाने आता अशा अत्याचाराविरोधात उभे राहून ते थांबवले पाहिजे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बुरेल यांचे वकील डेव्हिड हीथ यांनी सांगितले. हा निकाल पुराव्याच्या विरोधात असून त्याला पुन्हा आव्हान देण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे ते म्हणाले.

 गो-तस्करी करणाऱ्यांना भरचौकात गोळ्या घालणार – कर्नाटकमधील मंत्री

उत्तर कन्नड़ जिल्ह्यातील गाय चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री मंकल एस वैद्य य़ांनी इशारा दिला की, अशा घटनांत सामील लोकांना रस्त्यात व भरचौकात गोळ्या घातल्या जातील. मंत्री मंकल वैद्य  म्हणाले की, गो तस्करीत गुंतलेल्या व्यक्तींना रस्त्यावर किंवा चौकांमध्ये उघडपणे गोळ्या घातल्या जातील. वैद्य यांनी जिल्ह्यात असे प्रकार सुरू राहू देणार नसल्याचे सांगितले. गाई व गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व पावले उचलत असल्याची ग्वाही त्यांनी दिली. होन्नावरजवळ नुकत्याच झालेल्या गरोदर गायीच्या कत्तलीच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर वैद्य यांनी हे वक्तव्य केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर