Viral News : डुकराची किडनी प्रत्यारोपण करून जगात प्रसिद्ध झालेले ६३ वर्षीय रिचर्ड स्लेमन याचे निधन झाले आहे. अशा प्रकारची किडनी प्रत्यारोपित करणारा स्लेम हा जगातील पहिला व्यक्ति होता. त्यांच्या मृत्यूचे कारण कळू शकले नसल्याचे शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या मॅसॅच्युसेट्समधील हॉस्पिटलचे सांगितले की, स्लेमन याला डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपीत करण्यात आले होते. दरम्यान, या प्रत्यारोपणाशी संबंधित कोणत्याही कारणामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर चार तासांची शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर डुकराच्या अनुवांशिकरित्या बदललेल्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले होते. या प्रकारची ही जगातील पहिली शस्त्रक्रिया होती.
रुग्णालयाने म्हटले आहे की, रिक स्लेमनच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील कर्मचारी दु:खी आहेत. त्याच्यात कोणतेही लक्षणे दिसले नाहीत. त्यामुळे त्याच्या मृत्यू हा प्रत्यारोपणामुळे झाला की नाही हे सांगता येणार नाही. तसेच शस्त्रक्रिया यशस्वी झाली किंवा नाही या बाबत देखील कोणताही त्रास त्याला झाला नव्हता. स्लेमन हा आधीच टाइप २ मधुमेहाने ग्रस्त होता. तसेच त्याला उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता. अनेक वर्षांपासून त्यांचे डायलिसिस सुरू होते. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी पहिल्यांदा मानवी किडनी प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रियाही याच रुग्णालयात करण्यात आली.
दुर्दैवाने, पहिल्या प्रत्यारोपणाच्या पाच वर्षांतच ती किडनी निकामी होऊ लागली होती. २०२३ मध्ये त्यांनी पुन्हा त्याचे डायलिसिस सुरू केले. यामुळे स्लेमन याच्या प्रकृतीवर खूप वाईट परिणाम होत होता. स्लेमन नेहमी स्मरणात राहतील कारण त्यांनी वैद्यकीय शास्त्राच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, असे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे. तो अतिशय साधा आणि दयाळू माणूस होता.
स्लेमनच्या शरीरात प्रत्यारोपण केलेली किडनी केंब्रिज फार्मा कंपनीकडून ई-जेनेसिस प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आली होती. CRISPR Cas9 प्रक्रियेचा वापर करून डुकरांपासून मूत्रपिंड काढण्यात आले होते. यात डुकरांची जनुके बाहेर काढून तसेच काही मानवी जनुके टाकण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर स्लेमनच्या कुटुंबीयांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी रुग्णालयाचे आभार मानले. या आजाराशी झुंजत असलेल्या हजारो लोकांना नवीन मार्ग सापडावा आणि त्यांचे प्राण वाचावेत म्हणून स्लामने हे किडनी पुन्हा प्रत्यारोपण केले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
संबंधित बातम्या