Viral video : केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली. या पुरात अनेक नागरिक अडकून पडले होते. त्यांना या पुरातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बचावकार्य राबवले. दरम्यान, अशाच एका बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा देखील आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये, पूरग्रस्त भागात अडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही तरुणांनी महिंद्रा थारचा वापर केला आहे. या पाण्यात गाडी अर्धी बुडाली असतांनाही भर पाण्यातून गाडी धाडसाने चालवत अनेकांना पुराच्या पाण्यातून बाहेर तरुणांनी काढले. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करत मुलांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केरळमधील असल्याचे सांगितले जात आहे. जिथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सर्व सखल भागात पाणी साचले असून या पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. सरकारी यंत्रणांशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणही पूरग्रस्तांना मदत करण्यात गुंतले आहेत. दरम्यान, काही तरुणांनी पुराच्या पाण्यातून स्वार होऊन महिंद्रा थारचा वापर करून पूरग्रस्त नागरिकांना पाण्याच्या बाहेर सुरक्षित बाहेर काढले.
व्हिडिओतील तरुणांनी पुराच्या पाण्यात थार गाडी चालवतांना दिसत आहे. ही गाडी पुराच्या पाण्यात अर्ध्यापेक्षा जास्त बुडाली आहे. काही ठिकाणी तर थारचे स्टेअरिंगही पाण्यात बुडाले आहे. असे असतांनाही तरुण थार चालकांनी गाडी न थांबवता पुराच्या पाण्यात पूर्णपणे भिजूनही घरोघरी जाऊन पुरग्रस्थानणा बाहेर काढले आहे. त्याच्या या धैर्याने आणि जिद्दीने नगिरक सुरक्षित राहिले आहे. मुलांच्या या कृतीमुळे स्थानिक नागरिकांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. पुराच्या पाण्यात थारच्या माध्यमातून मदतकार्य करण्याची ही पद्धत लोकांना चांगलीच आवडली आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आनंद महिंद्रा यांनी बचाव कार्याचा हा विडिओ इन्स्टाग्रामवर आणि एक्सवर शेअर केला आहे. या अनोख्या मदत कार्याचे त्यांनी कौतुक केले. या तरुणांच्या धाडसी कृत्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, तरुणांनी जोखीम पत्करून केलेल्या मदत कार्याबद्दल कौतुक केले असले तरी भविष्यात कुणी या प्रकाराचे अनुकरण करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. या व्हिडिओला आतापर्यंत ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.