Thane News: ठाण्यात बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने पोटच्या सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडिताच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात दिली. जवळपास सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणातील आरोपीला अद्याप अटक झाली नसून पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाईला सुरुवात करणार आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
ठाण्यातील विष्णूनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने आपल्या पतीविरोधात पोटच्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार नोंदवली. जून महिन्यापासून हा किळसवाणा प्रकार सुरू असल्याचे महिलेने सांगितले. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्यावर अत्याचार करायचा, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी कारवाई सुरू केली आहे. आरोपीला लवकरच अटक करून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या