Thane: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेननं उडवलं; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Thane: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेननं उडवलं; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Thane: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेननं उडवलं; २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ashwjeet Jagtap HT Marathi
Published Feb 06, 2025 04:23 PM IST

Thane Man Killed Hit By Train: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना ट्रेननं धडक दिल्याने एका २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे: रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेनने उडवल्याने तरुणाचा मृत्यू
ठाणे: रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेनने उडवल्याने तरुणाचा मृत्यू

Thane Train Accident News: ठाण्यात रेल्वे रुळांवर सेल्फी काढताना एक्स्प्रेस ट्रेनने धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली घडली, अशी माहिती कल्याण येथील सरकारी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.

साहिर अली असे या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. साहिर हा ठाण्यातील अंबरनाथ भागात त्याच्या नातेवाईकांना भेटायला आला होता, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. साहिर हा आपले नातेवाईक आणि मित्रांसह सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्यासाठी अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांदरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली गेले. परंतु, सेल्फी काढत असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत साहिरचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी साहिरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. रेल्वे आणि पोलिस अधिकाऱ्यांनी लोकांना रेल्वे रुळ ओलांडण्याचा आणि त्यावरून न चालण्याचा इशारा दिला आहे.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर