Thailand PM : बांगलादेशनंतर थायलंडमध्ये राजकीय उलथापालथ; न्यायालयाकडून पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी-thailand constitutional court dismiss pm srettha thavisin ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Thailand PM : बांगलादेशनंतर थायलंडमध्ये राजकीय उलथापालथ; न्यायालयाकडून पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी

Thailand PM : बांगलादेशनंतर थायलंडमध्ये राजकीय उलथापालथ; न्यायालयाकडून पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची हकालपट्टी

Aug 14, 2024 03:56 PM IST

srettha thavisin News : रिअल एस्टेट टायकून श्रेथा बीते गेल्या १६ वर्षातील थायलंडचे चौथे पंतप्रधान आहेत, ज्यांचे न्यायालयाच्या निर्णयाने पद गेले आहे. कोर्टाने म्हटले की, श्रेथा यांनी नैतिक तत्वे पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदी नियुक्त करून संविधानाचे उल्लंघन केले आहे.

 थायलंड पंतप्रधान श्रेथा थाविसिन
थायलंड पंतप्रधान श्रेथा थाविसिन

बांगलादेशात झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देशातून परागंदा व्हावे लागले होते. त्यानंतर आता थायलंडच्या घटनात्मक न्यायालयाने (Thailand constitutional court)  बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन (srettha thavisin) यांना पदावरून हटवले आहे. जेलमध्ये जाऊन आलेल्या माजी वकिलास मंत्रिमंडळात नियुक्त केल्याप्रकरणी त्यांना बर्खास्त करण्यात आले आहे. 

रिअल एस्टेट टायकून श्रेथा बीते गेल्या १६ वर्षातील थायलंडचे चौथे पंतप्रधान आहेत, ज्यांचे न्यायालयाच्या निर्णयाने पद गेले आहे. कोर्टाने म्हटले की, श्रेथा यांनी नैतिक तत्वे पूर्ण न करणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपदी नियुक्त करून संविधानाचे उल्लंघन केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाने पंतप्रधानांना हटवल्यानंतर देशात राजकीय उलथापालथ झाली असून सत्ताधारी आघाडीत फेरबदल होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या थायलंडचे  उपपंतप्रधान फुमथम वेचयाचाई यांच्याकडे कार्यवाहक पंतप्रधानपद जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीथा यांनी शिनावात्राचे माजी वकील पिचिट चुएनबान यांची कॅबिनेटमध्ये नियुक्ती कायम ठेवली होती. त्यांना २००८ मध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांना लाच देण्याच्या प्रकरणात तुरुंगवास ठोठावला होता. दरम्यान त्यांच्यावर लाच दिल्याचा आरोप सिद्ध झाला नव्हता. तरीही श्रेथा यांनी पिचिट चुएनबान यांनी कॅबिनेट पद देऊन संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला. हा आरोप सत्य मानून न्यायालयाने पंतप्रधानांना पदावरून हटवले.

थायलंड कठीण काळात -

श्रीथा यांना पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेऊन एक वर्षही झाले नव्हते. एका वर्षाहून कमी काळात श्रीथा यांना हटवण्याचा अर्थ आहे की, नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे लागणार. येथे गेल्या दोन दशकात सत्तापालट व न्यायालयाच्या निकालांनी अनेक सरकारे कोसळली आहेत. देशात पुन्हा एकदा राजकीय अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीथा यांची फू थाई पार्टीवर याचे विपरीत परिमाण होत आहेत. गेल्या काही वर्षापासून थायलंडमधील सरकार बदलत आहे.

थायलंडची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात असतानाच न्यायालयाने पंतप्रधानांना पदावरून हटवले आहे. कमी झालेली निर्यात, गगनाला भिडलेली महागाई यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. बुराफा विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि कायदा विभागाचे डिप्टी डीन ओलार्न थिनबँगटियो यांनी म्हटले की, सत्ताधारी आघाडी एकजूट आहे. या निर्णयाने त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होईल मात्र यातून ते पार पडतील.  थायलंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळे भारतासह आशियाई देशांची चिंता वाढू शकते. 

विभाग