Elon Musk became father of twelfth child : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले इलॉन मस्क हे या वर्षी १२ व्या मुलाचे वडील झाले आहेत. त्यांनी ही बाब लपवल्याचा त्यांच्यावर आरोप होत होता. मात्र, या बाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत ते १२ व्या मुलाचे वडील झाले असल्याची माहिती शेअर करत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी मुलगा झाली की मुलगी या बाबत खुलासा केलेला नाही. मस्क म्हणाले, माझ्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना ही बाब माहिती असून त्यांनी अपत्याच्या जन्माचं स्वागत केलं आहे.
इलॉन मस्क हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांची जगातील श्रीमंत व्यक्ति म्हणून देखील ओळख आहे. मस्क पुन्हा वडील झाल्यावर अनेकांना ही बातमी माहिती नव्हती. पण मस्क पुन्हा वडील झल्याची बातमी पुढे आल्यावर अब्जाधीश इलॉन मस्क यांनी देखील विनोदी मूडमध्ये ही बातमी सर्वांना दिली. मस्क म्हणाले, मला आणि झिलिसला मूल होणार असल्याची घोषणा करून एक प्रेस रिलीझ काढण हे विचित्र वाटलं असतं मी गुपचूपपणे वडील झालो असे अनेकांनी म्हटलं आहे. मात्र, तेही खोटं आहे. माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना माहीत आहे. माझ्या या आनंददाई बातमीची प्रेस रिलीझ जारी न केल्याने, ते कुणाला कळलं नाही. याचा अर्थ असा होता की हे जे काही झाले ते लपून छपून झाले. इलॉन मस्कचे हे १२वे अपत्य आहे. मस्क यांनी अद्याप मुलाचे नाव व लिंग उघड केलेले नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मस्क यांनी लोकसंख्या घटण्याबाबत आणि घटत्या जन्मदरावरही चिंता व्यक्त केली. इलॉन मस्क म्हणाले, "अनेक देशांचा जन्मस्तर खालवलेला आहे. काही देशांचा जन्मदर हा २.१ ऐवढा आहे. साहजिकच संपूर्ण जगात लोकसंख्या ही कमी होणार आहे. २०२२ मध्ये, इलॉन मस्क म्हणाले की आतापर्यंतचा सर्वात मोठा धोका म्हणजे जन्मदर कमी होणे आहे. त्यामुळे त्यांनी मोठ्या कुटुंबांना पाठिंबा दिला होता.
एलोन मस्क यांनी यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये स्ट्रायडर आणि अझूर या जुळ्या मुलांचे वडील झाले होते. त्यांनी या जुळ्या मुलांचे पत्नी जिलिससोबत स्वागत केले होते. काही काळानंतर, जिलिसने ऑल्ट-पॉप गायिका ग्रिम्सने सरोगसीच्या माध्यमातून ॲक्सा डार्क सिडरेलला जन्म दिला. अक्सा जीला वाय म्हणूनही ओळखलं जातं. सध्या ३६ वर्षीय ग्रिम्स व एलोन मस्क यांच्यात त्यांच्या तीन मुलांच्या ताब्याबाबत कायदेशीर वाद सुरू आहे. एलोन मस्क त्याच्या ४ वर्षांच्या मुलासह विविध कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. ते फेब्रुवारीमध्ये लास वेगासमधील सुपर बाउलमध्ये, मार्चमध्ये जर्मनीतील टेस्ला प्लांटमध्ये आणि या महिन्याच्या सुरुवातीला फ्रान्समधील कान्स लायन्स फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या मुलांसोबत एकत्र दिसले होते. एलोन मस्क हे ग्रिफीन आणि व्हिव्हियन या जुळ्या मुलांचे वडील आहेत, तसेच काई, सॅक्सन आणि डॅमियन या तिघांचेही वडील आहेत.
संबंधित बातम्या