तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे दहशतवादी हल्ला झाला आहे. तुर्कीची राजधानी अंकारा येथे हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेकांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कमीत कमी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीच्या मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी TUSAS च्या परिसरात हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
तुर्कीचे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी बुधवारी सांगितले की, राजधानी अंकारा येथील तुर्की एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या (TUSAS) मुख्यालयात झालेल्या भीषण स्फोट आणि गोळीबारात किमान ४ जण ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन रशियाच्या कझान शहरात असताना हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा रवाना करण्यात आल्याचे सरकारी एजन्सीने सांगितले.
तुसास (TUSAS) ही तुर्कस्तानची सर्वात महत्वाची संरक्षण आणि विमान वाहतूक कंपनी आहे. देशातील पहिले राष्ट्रीय लढाऊ विमान 'केएएएन'ची निर्मिती ही कंपनी करते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, हल्लेखोरांनी काही लोकांना बंधक बनवले आणि कारखान्याबाहेर दोन स्फोट आणि संघर्ष झाल्याचे ऐकले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तुर्कस्तानचे गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी हा दहशतवादी हल्ला असून यात काही जण ठार आणि जखमी झाल्याची माहिती दिली आहे. टुर्किये टुडे या माध्यम संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी काही लोकांना बंधक बनवले आहे.
तुर्की एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या एका व्हिडिओ फुटेजमध्ये विशेष पोलिस दल दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेत प्रवेश करताना दिसत आहे, त्याआधी एका फुटेजमध्ये काही दहशतवादी सुरक्षा घेरा तोडून कारखान्याच्या आवारात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका होत्या. तुर्कीचे न्यायमंत्री इल्माझ तुंच यांनी या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
हा स्फोट आत्मघातकी हल्लेखोरामुळे झाला असावा, असे स्थानिक प्रसारमाध्यमे हॅबरतुर्क टेलिव्हिजनने म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आवारात झालेल्या स्फोटानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. एनटीव्ही टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दल, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याचे हॅबरतुर्क यांनी सांगितले.
संबंधित बातम्या