इंडोनेशियातील एका फुटबॉल सामन्यात वीज कोसळल्याने एका खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अंगावर वीज कोसळल्याने फुटबॉलपटूला गंभीर दुखापत झाली. परंतु, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या थरारक क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एका एक्स युजरने या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, इंडोनेशियात फुटबॉल सामन्यादरम्यान एका व्यक्तीवर वीज कोसळली. या क्लिपमध्ये खेळाडू मैदानात उभा असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. यानंतर लगेच तो जमिनीवर कोसळला. इतर खेळाडू त्याच्या मदतीसाठी धावतात, असे या व्हिडिओत दिसत आहे.
ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. हा सामना खेळताना पाऊस सुरू होता. त्यावेळी वीज खेळाडूच्या अंगावर कोसळली. यानंतर इतर खेळाडूंनी त्याला उपचारासाठी सरिनिंगसिह रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारपूर्वीच त्याला मृत घोषित केले.
पीआरएफएम न्यूज या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील पश्चिम जावा मधील बांडुंग येथील सिलिवांगी स्टेडियममध्ये दोन फुटबॉल संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यादरम्यान ही घटना घडली. फुटबॉलपटूने परिधान केलेल्या जर्सीवर जळाण्याच्या खुणा होत्या, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
संबंधित बातम्या