Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमधील अग्निकांडात १० हजार कोटींचा अलिशान बंगला खाक, अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांनाही आग
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमधील अग्निकांडात १० हजार कोटींचा अलिशान बंगला खाक, अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांनाही आग

Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमधील अग्निकांडात १० हजार कोटींचा अलिशान बंगला खाक, अनेक हॉलिवूड स्टार्सच्या घरांनाही आग

Jan 11, 2025 08:53 PM IST

Los Angeles Fire : लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या भीषण आगीत अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगलेही जळून खाक झाले आहेत. या आगीत १० हजार कोटी रुपये खर्च करून बांधलेली आलिशान हवेलीही जळून खाक झाली.

लॉस एंजेलिसमधील अग्निकांडात १० हजार कोटींचा अलिशान बंगला खाक
लॉस एंजेलिसमधील अग्निकांडात १० हजार कोटींचा अलिशान बंगला खाक (AP)

लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात १० जानेवारीपर्यंत लागलेल्या भीषण वणव्यामुळे किमान डझनभर लोकांचा मृत्यू झाला असून हजारो घरे, इमारती आणि इतर वास्तू उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात आहे. लुमिनार टेक्नॉलॉजीजचे सीईओ ऑस्टिन रसेल यांची १८ बेडरूमची हवेलीही आगीत जळून खाक झाली. या हवेलीचा वापर अनेक मोठ्या कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी करण्यात येत होतो. कॅलिफोर्निया शहरातील ही  सर्वात महागडी हवेली होती.

या हवेलीची किंमत जवळपास १२ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १०७७० कोटी रुपये होती. आता या हवेलीच्या जागी फक्त ढिगारा शिल्लक आहे. एचबीओच्या सक्सेशन सीझन ४ मध्ये ही हवेली दाखवण्यात आली होती आणि त्यानंतर ती चर्चेत आली होती. या हवेलीत खूप चांगल्या सोयी-सुविधा होत्या. यात २० आसनांचे थिएटर आहे.  वाइन सेलर आणि स्टारगॅझिंगसह शेफ किचन होते.

त्यातील काही भाग अजूनही शिल्लक आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २.०४ अब्ज डॉलर्सची (सुमारे १६५९० कोटी) लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीने हॉलिवूड हिल्सवर २५ मिलियन डॉलर्स खर्चून भव्य व अलिशान बंगला बांधला होता. या हवेलीच्या मालकाचे नाव एडविन कॅस्ट्रो होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता या हवेलीतील फक्त जळणारी लाकडे शिल्लक राहिली आहेत. या हवेलीत पाच बेडरूम आणि सहा बाथरूम होते.

अनेक हॉलीवूड कलाकारांची घरे स्वाहा -

या आगीत अनेक हॉलिवूड स्टार्सची घरे जळून खाक झाली आहेत. सांता एना वारे शुष्क व शक्तिशाली वारे आहेत जे डोंगरावरून दक्षिण कॅलिफोर्निया किनाऱ्याकडे वाहतात. या भागात दरवर्षी सरासरी १० अशा घटना घडतात. 

जेव्हा परिस्थिती कोरडी म्हणजे शुष्क असते, जसे की आता आहे, तेव्हा हे वारे आगीचा भयानक धोका बनू शकतात. पूर्वेकडील 'ग्रेट बेसिन'मध्ये उच्च दाब आणि किनाऱ्यापासून दूर कमी दाबाची यंत्रणा निर्माण झाल्यास सांता एना वारे वाहतात. हवेचे वस्तुमान उच्च दाबाकडून कमी दाबाकडे सरकते आणि दाबाचा फरक जितका जास्त असेल तितक्या वेगाने वारे वाहतात. 'ग्रेट बेसिन', ज्याला बहुधा 'ग्रेट बेसिन' वाळवंट म्हणून संबोधले जाते, हे पश्चिम उत्तर अमेरिकेचे एक प्रमुख नैसर्गिक वैशिष्ट्य आहे, ज्यात खडकाळ पर्वतरांगा आणि उत्तर-दक्षिणेकडे पसरलेल्या मोठ्या मध्यवर्ती खोऱ्यांचा समावेश आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर