Ten children drown: नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Ten children drown: नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

Ten children drown: नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

Updated Oct 06, 2024 10:39 PM IST

Ten children dies by drowning: नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील तुम्बा गावात ही घटना घडली.

नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू
नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू (HT)

Ten children die by drowning in Bihar: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील तुंबा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सोन नदीत आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरैया ढालाजवळ ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून सर्व मृतांच्या वारसांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही दुर्घटना अत्यंत दु:खद असून मुख्यमंत्र्यांना या घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. बिहारमधील सर्व मृतांच्या वारसांना तातडीने चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

आज रोहतास जिल्ह्यातील तुंबा गावातून ५ मुलांचे मृतदेह सासाराम सदर रुग्णालयात आणण्यात आले. या प्रथमदर्शनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्यासारखे वाटले. सध्या आम्ही सर्व औपचारिकता पूर्ण करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती हॉस्पिटल सासारामचे डॉ. रमेश यांनी दिली.

नाशिक: खेकडे पकडायला गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

नाशिकमध्ये शेत तळ्यात खेकडे पकडायला गेलेल्या दोन मुलांना पाण्यात बुडून मृत्यू झाला झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली. ही घटना अंबड-सातपूर लिंक रोडवर असलेल्या संजीवनगरमध्ये घडली. पाण्यात बुडालेली मुले ८ आणि ११ वयोगटातील असून ते विराटनगर येथे वास्तव्यात होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही आपल्या मित्रांसह घराजवळील शेत तळ्यात खेकडे पकडायला गेले असताना पाण्यात बुडाले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे: गणपतीचे विसर्जन करताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू

पुण्यात घरातील गणपतीचे विसर्जन करताना बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना १२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कडधे गावात घरगुती गणपतीचे विसर्जन करताना ही घटना घडली. संजय धोंडू शिर्के (वय, ४५) आणि हर्षल संजय शिर्के (वय, २२) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बाप- लेकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पाण्यात बुडाल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात संजय याचाही मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे, दोघांनाही पोहता येत नव्हते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर