मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  WhatsApp चा बँड वाजणार; Telegram नं सुरू केली प्रीमियम सेवा

WhatsApp चा बँड वाजणार; Telegram नं सुरू केली प्रीमियम सेवा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 20, 2022 02:43 PM IST

टेलीग्राम प्रीमियम वापरणा-या युझर्सना आता खुश खबरी मिळणार आहे. टेलीग्राम नव्या सुविधे अंतर्गत अनेक फिचर देणार आहे. जवळपास ४ जीबीच्या फाईल्स अपलोड करणे, वेगाने डाऊनलोड करने, एक्सक्लूझिव्ह स्टिकर्स आणि या प्रकारच्या अनेक सुविधा टेलीग्राम देणार आहे.

टेलिग्राम
टेलिग्राम

Telegram premium service launched ७० कोटी यूजर्स पुर्ण झाल्यावर प्रसिद्ध मेसजिंग अ‍ॅप असलेल्या टेलीग्रामने त्यांची प्रीमियम सेवा नुकतीच लाँच केली आहे. टेलीग्रामने ही सुविधा वापरणा-या यूझर्सना नव्या फिचर्सची मेजवाणी दिली आहे. या नव्या फिचर्समध्ये ४ जीबी पर्यंतच्या फाईल्स अपलोड करणे, वेगाने डाउलोड करणे, एक्सक्लूझिव्ह स्टिकर्स या सारख्या अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. रिपोर्टनुसार कंपनी यासाठी दर महिन्याला, ४.९९ डॉलर्स पैसे आकारणार आहे. भारतीय यूझर्ससाठी किती किंमत राहिल या बाबत काही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही.

४ जीबी पर्यंतच्या फाईल्स पाठवता येणार

टेलीग्रामच्या सर्व यूझर्सना २ जीबी पर्यंतची फाईल्स पाठवीण्यासाठी सुविधा सुरवातीपासूनच उपलब्ध आहे. मात्र, टेलीग्राम प्रीमियम ग्राहकांजवळ ४ जीबीच्या फाईल्स पाठवण्याची लिमिट राहणार आहे. मात्र, या फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी प्रीमियम मेंबरशिप गरजेची राहणार नाही.

सर्वाधिक वेगाने डाऊलोड करता येणार

टेलीग्रामच्या प्रीमियम सब्सस्क्राईबरजवळ टेलीग्राम सर्व्हरवर सर्वात वेगवान डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टमध्ये या बाबत सांगण्यात आले आहे की, यूझर्स त्यांच्या मर्यादित क्लाऊड स्टोरेजमध्ये शक्यतो तेवढ्या वेगवान इंटरनेटमध्ये सर्वकाही एक्सेस करू शकतात.

चैनल्स, चॅट फोल्डर्सची मर्यादाही वाढवली

प्रीमियम युझर्ससाठी स्टॅडंर्ड अकाऊंटवर ठेवण्यात आलेल्या सर्व गोष्टींची मर्यादा वाढविण्यात आली आहे. उदाहणार्थ, टेलीग्राम प्रीमियम ग्राहक १ हजार चॅनल फॉलो करू शकतात. त्यातत प्रत्येक २०० चॅट सोबत २० चॅट फोल्डर बनवता येऊ शकते. या सोबतच टेलीग्रामच्या अ‍ॅपमध्ये चौथ्या अकाऊंटलाही जोडल्या जाऊ शकते. या सोबतच मुख्य यादीत १० चॅट पिन करता येणार आहेत.

व्हॉईस-टू-टेक्स्ट फीचर

टेलीग्राम प्रीमिअर यूझर्ससाठी व्हाईस नोट्सला टेक्स्टमध्ये बदलण्यासाठी सक्षम आहेत. या ट्रासक्रिप्शनच्या यूझर्सला रेटींगही देता येणार आहे. यामुळे वेळेनुसार त्यात आणखी चांगल्या गोष्टी अ‍ॅड करता येणार आहे.

अनलिमिटेड प्रोफाईल व्हिडीओ

प्रीमियम युझर्ससाठी प्रोफाईल व्हिडीओ वापरण्यासाी सक्षम राहणार आहेत. जे युझर्स यांना सुद्धा पाहता येणार आहेत. सर्व प्रीमिअर यूझर्सना या संदर्भातील एक बॅच मिळणार आहे जो चॅट लिस्ट, चॅट हेडर, आणि सर्व ग्रुपच्या सदस्यांना त्यांच्या मेंमर लिस्टच्या पुढे दिसेल.

WhatsApp channel