Viral news : टेलीग्रामच्या संस्थापकाची १२ देशांत १०० हून जास्त मुलं! हे कसं घडलं? जगभरात चर्चेला उधाण
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : टेलीग्रामच्या संस्थापकाची १२ देशांत १०० हून जास्त मुलं! हे कसं घडलं? जगभरात चर्चेला उधाण

Viral news : टेलीग्रामच्या संस्थापकाची १२ देशांत १०० हून जास्त मुलं! हे कसं घडलं? जगभरात चर्चेला उधाण

Jul 31, 2024 03:18 PM IST

Viral news : टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांचे १२ देशांमध्ये १०० पेक्षा जास्त मुले आहेत. हे सर्व कसे शक्य झाले याची माहिती देखील पावेल यांनी दिली आहे.

टेलीग्रामचे फाऊंडर निघाले ‘विकी डोनर’! १२ देशांत १०० पेक्षा जास्त मुलं! धक्कादायक गोष्ट केली शेअर
टेलीग्रामचे फाऊंडर निघाले ‘विकी डोनर’! १२ देशांत १०० पेक्षा जास्त मुलं! धक्कादायक गोष्ट केली शेअर

Viral news : सोशल मीडिया ॲप टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचा हा खुलासा ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. पावेल यांनी त्यांचे १२ देशांमध्ये १०० पेक्षा जास्त मुले असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हे कसं शक्य केलं याची माहिती देखील दिली आहे.

पावेल यांनी सांगितलं की, ते गेल्या १५ वर्षांपासून मुल बाळ होत असलेल्या जोडप्यांना शुक्राणू दान करत आहेत. याची सुरुवात साधी सोपी नव्हती असं देखील त्यांनी म्हटलं आहे. हा प्रकार म्हणजे सुरुवातीला त्यांना वेडेपणा वाटला. मात्र, नंतर त्यांच्या सोबत घडलेल्या एका घटनेने त्यांचे संपूर्ण विचार बदलून गेले. त्यांनी या कार्याला समाजाप्रती असलेले कर्तव्य मानले. ते 'स्पर्मडोनर' कसे झाले, याची गोष्ट देखील त्यांनी शेयर केली आहे.

पावेल दुरोव हे टेलिग्रामचे संस्थापक आहेत. फोर्ब्सच्या मते, २०२४ मध्ये त्यांची अंदाजे संपत्ती १५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. अब्जाधीश उद्योगपती पॉवेल यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की १२ देशांमध्ये त्यांची १०० हून अधिक मुले आहेत. ही सर्व मुले त्यांनी दान केलेल्या स्पर्ममधून जन्माला आली असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी त्यांनी शुक्राणू दान करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मित्राने त्याच्याकडे एक विचित्र मागणी केली. पॉवेलच्या मते, त्याच्या मित्राला मुले होत नव्हती. त्यामुळे पती-पत्नी दोघेही त्याच्याकडे आले आणि त्यांना मदत करण्याची विनंती केली.

असे बनले पावेल दुरोव स्पर्म डोनर

पावेलने सांगितले की, त्याच्या मित्राने खूप विनंती केल्यानंतर, ते क्लिनिकमध्ये जाऊन शुक्राणू दान करण्यास तयार झाले. यानंतर त्यांचा मित्र व त्याची पत्नी एका निरोगी मुलाचे पालक बनले. "मित्र व त्याच्या पत्नीला मुले होऊ शकत नअसल्याने त्यांनी मला विनंती करत एका क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करण्यास सांगितले जेणेकरुन टेस्टट्यूब बेबी द्वारे त्यांना मूल होईल," असे पावेल म्हणाले, त्यांची ही विनंती ऐकून सुरवातीला पावेल हसायला लागले. मात्र, ही घटना गंभीर असल्याचे त्यांना कळले.

पावेल म्हणाले, म्हणाले की, येथूनच शुक्राणू दान करण्याचा माझा प्रवास सुरू झाला. मला नुकतेच कळले की मला १०० पेक्षा जास्त जैविक मुले आहेत. पावेल यांनी लग्न केले नाही व त्यांना नेहमीच एकटे राहणे आवडते असे देखील ते म्हणाले.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर