Telngana Road Accident: तेलंगाणा राज्यातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात ७ जणांचा बळी गेला आहे. तेलंगाणामधील वारंगल -मामुनुरु मार्गावर रेल्वे ट्रॅक (railway track) बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठीवापरले जाणारे लोखंडी रॉड ट्रकमधून नेले जात होते. हे रॉड ऑटो रिक्षावर पडले आहेत. याखाली दबल्याने ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर या अपघातात सहा जण गंभीर जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, वारंगल -मामुनूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेलवे ट्रॅकसाठी वापरण्यात येणारे लोखंडी रॉडची वाहतूक करणारा ट्रक महामार्गावरून जात होता. त्याच्या समोर दोन ऑटो रिक्षा जात होत्या. ट्रक चालकाने ऑटोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकचे संतुलन बिघडले व ट्रकमधील लोखंडी रॉड रिक्षावर कोसळले.
ट्रक चालकाच्या बेजबाबदारपणामुळे सात लोकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. वारंगल-मामुनुरु मार्गावर भारत पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. अचानक ब्रेक मारल्याने ट्रक पलटी झाली व ट्रकमधील लोखंडी रॉड ऑटो रिक्षावर कोसळले. यामध्ये दोन्ही रिक्षातील प्रवासी दबले गेले. या अपघाता सात लोकांना मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मृतांमध्ये एका लहान मुलासह चार महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व मदत व बचावकार्य सुरू केले. राष्ट्रीय महामार्गावर पडलेले लोखंडी रॉड हटवण्यासाठी मोठी क्रेन बोलावली गेली. अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून हटवली गेली. या अपघातात दोन्ही रिक्षांचा अक्षरक्ष: चोळामोळा झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या