मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  महिलेला भरदिवसा जिवंत जाळले, घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण

महिलेला भरदिवसा जिवंत जाळले, घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण

Jan 10, 2024 03:42 PM IST

Telangana News : तेलंगाणा राज्यातील मोइनाबाद येथे एका महिलेला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटनास्थळाचे दृष्य
घटनास्थळाचे दृष्य

तेलंगाणामधील हैदराबादमध्ये एका महिलेला भरदिवसा जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील दहशतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी तेलंगाणा राज्यातील मोइनाबाद येथे घडली. येथील लोकांनी पाहिले की, एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पडला आहे. यानंतर याची सूचना पोलिसांना देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. महिलेचा मृतेदह गावात शेतांकडे जाणाऱ्या रस्त्यात पडला होता. मृतदेह ९० टक्के जळालेल्या अवस्थेत होता. 

शेतकरी आपल्या शेतांकडे जात असताना रस्त्यात त्यांना महिलेचा जळालेला मृतदेह दिसला. याची सूचना शेतकऱ्यांनी मोइनाबाद पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

याबाबत मोइनाबाद पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हैदराबाद, सायबराबाद आणि रचकोंडा  पोलिसांना विचारले आहे की, एखादी महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे का?  अजूनपर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनी सांगितले की, पोस्टमार्टम रिपोर्ट अजून मिळालेला नाही. महिलेची हत्या कोणी केली व ही महिला कोण आहे, याचा तपास केला जात आहे.

WhatsApp channel
विभाग